आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Action Of The State Excise Department In Pune, Goa State Made Foreign Liquor Including Foreign Liquor Worth About Rs 87 Lakh 89 Thousand Seized

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई:गोवानिर्मित विदेशी मद्यासह सुमारे 87 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी कारवाई करत सुमारे 87 लाख 89 हजार 520 रुपये किमतीचा मद्यसाठा तसेच मध्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 1 कोटी 5 लाख 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव विभागाच्या पथका मार्फत बुधवारी तळेगाव दाभाडे शहराच्या हददीत, जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील हॉटेल शांताई समोर रोडवर सापळा लावुन गोवा राज्य निर्मीती व केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचा साठा घेवुन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीचा ट्रक जप्त करुन कारवाई करण्यात आली. या ट्रकची (क्र.एम एच 46 एएफ - 6138) तपासणी केली असता त्यामध्ये रिअल व्हिस्की 750 मि.ली चे 4 हजार 164 सीलबंद बाटल्या व रिअल व्हिस्की 180 मि.ली चे 5 हजार 760 सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की 750 मि.ली चे 9 हजार 600 सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकूण 1 हजार 267 बॉक्स मिळून आले.

या कारवाईत 87 लाख 89 हजार 520 रुपये किमतीचा मद्य साठा व बेकायदेशीरपणे मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनसह 1,कोटी 5 लाख 7 हजार 520 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यामध्ये वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार (वय 24 वर्षे, रा.मु.पो. तांबोळे ता. मोहोळ जि. सोलापूर), देविदास विकास भोसले (वय-29 वर्षे रा. मु.पो खवणी ता.मोहोळ जि.सोलापूर) यांना अटक करुन त्यांच्या विरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

ही कारवाई , राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रविण शेलार, दुय्यम निरीक्षक. दिपक बा. सुपे, दुय्यम निरीक्षक प्रशांत दळवी, संजय राणे, योगेंद्र लोळे, महेश लेंडे, स्वाती भरणे, सहा. दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, रवि लोखंडे व जवान भागवत राठोड, राहुल जौंजाळ, रसुल काद्री, तात्या शिंदे, दत्ता पिलावरे, शिवाजी गळवे आदींनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक दिपक सुपे हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...