आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Actor Ramesh Dev | Marathi News | Death Of Ramesh Dev, A Brilliant Actor In Marathi And Hindi Films; At The Age Of 93, He Breathed His Last

अभिनेते रमेश देव यांचे निधन:मराठी, हिंदी चित्रपटांतील चतुरस्र अभिनेते रमेश देव यांचे निधन; वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी चतुरस्र कामगिरी तब्बल सहा दशके करणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (९३) यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. रुपेरी पडद्याप्रमाणे रमेश देव यांनी एकेकाळी मराठी रंगभूमीही गाजवली होती. देव यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

देव यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री सीमा, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. देव यांनी मराठी आणि हिंदी मिळून सुमारे ५०० चित्रपटांतून भूमिका साकारल्या. ३० जानेवारीला नुकताच त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव यांचे घराणे मूळ राजस्थानचे. आजोबांच्या काळातच कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी रमेश देव यांच्या आजोबांना कोल्हापूरला पाचारण केले आणि तेव्हापासून देव घराणे कोल्हापूरकर बनले. रमेश देव यांचे शिक्षणही कोल्हापूरला झाले.

देखणे व्यक्तिमत्त्व, नवे काही करण्याची ऊर्मी, उपजत अभिनयगुण, परिश्रमांची तयारी यामुळे रमेश देव यांची कारकीर्द सुरुवातीला खलनायक म्हणून (आंधळा मागतो एक डोळा) म्हणून सुरू झाली. हा चित्रपट गाजला. देव यांच्या भूमिकेचे कौतुक झाले आणि मग खलनायकाच्या भूमिका त्यांच्याकडे चालत आल्या. नंतर रमेश देव यांचा पडद्यावरील नायक प्रेक्षकांना चांगलाच भावला. प्रादेशिक चित्रपटांपुरती आपली ओळख मर्यादित न ठेवता रमेश देव यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, ते राजश्री प्रॉडक्शनच्या ‘आरती’ या चित्रपटातून. हा चित्रपटही यशस्वी ठरला आणि देव यांची बॉलीवूडमधील कारकीर्दही दीर्घ कालावधीची ठरली.

रुपेरी पडद्यावर रमले असूनही देव यांनी मराठी रंगभूमीवरही तितकेच प्रेम केले. त्यासाठी ‘अजिंक्य थिएटर्स’ या नाट्यसंस्थेची स्थापना करून त्यांनी तुझे आहे तुजपाशी, लग्नाची बेडी, अकुलिना, मवाली, लाल बंगली..आदी नाटकांचे शेकडो प्रयोग रंगवले. देव यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शन, निर्मिती, कॅमेरा, संकलन, प्रसिद्धी..अशा अन्य घटकांमध्येही रस घेतला आणि त्यात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न केला. ‘सर्जा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ठरला. सेनानी साने गुरुजी या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. याशिवाय वासुदेव बळवंत फडके, गोष्ट लग्नानंतरची, जेता या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली.

आंधळा मागतो एक डोळा ते... शिकार
मराठी : आंधळा मागतो एक डोळा, गाठ पडली ठकाठका, देवघर, सात जन्माचे सोबती, पैशाचा पाऊस, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, वरदक्षिणा, माझी आई, भाग्यलक्ष्मी, शेवटचा मालुसरा, भाऊराया, चिमुकला पाहुणा, पडछाया, माझा होशील का, गुरुकिल्ली, फटाकडी, भामटा, बायको असावी अशी, हेच माझे माहेर, उमज पडेल तर.

हिंदी चित्रपट : आनंद, आरती, आपकी कसम, मोहब्बत इसको कहते हैं, जमीर, तकदीर, दस लाख, खिलौना, जीवन मृत्यू, कोरा कागज, आखरी दांव, औलाद, घायल, इक महल हो सपनो का, कोशिश, रामपुर का लक्ष्मण, सरस्वती चंद्र, शिकार.
पाचशेहून अधिक मराठी, हिंदी चित्रपटांत भूमिका

बातम्या आणखी आहेत...