आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक:गोखलेंचे कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी दिली माहिती

पुणे5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या २४ तासांपासून व्हेंटिलेटरवर असलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. बुधवारी त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांचे मेडिकल बुलेटिन जारी करण्यात येणार आहे.

गोखलंेचे कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी गुरुवारी सांगितले, ‘डॉक्टरांच्या उपचारांना ते म्हणावा तसा प्रतिसाद देत नाहीयेत. त्यांचे अवयव निकामी झाले आहेत. बुधवारी कोमात गेल्यापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयत. त्यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरवू नका,’ अशी विनंती दामलेंनी केली.

बातम्या आणखी आहेत...