आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिनेसृष्टीत सनई-चौघडे:सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर अडकले लग्नाच्या बेडीत, थाटामाटात पार पडला लग्नसोहळा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यात पारंपरिक पद्धतीने सिद्धार्थ-मितालीने लग्न केले (फोटो सौजन्य : gaatha.co.in) - Divya Marathi
पुण्यात पारंपरिक पद्धतीने सिद्धार्थ-मितालीने लग्न केले (फोटो सौजन्य : gaatha.co.in)
  • पुण्यात हा विवाहसोहळा पार पडला.

सध्या लगीनसराई सुरू आहे. सगळीकडेच सनई चौघडे वाजत आहे. नव्या वर्षात मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकार मंडळी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर आज अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

पुण्यात हा विवाहसोहळा पार पडला. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. त्यामुळे हा लग्नसोहळा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत होता. आज अखेर सिद्धार्थ आणि मिताली खऱ्या अर्थाने कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने एकमेकांचे झाले आहेत.

अस्सल मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला (फोटो सौजन्य : gaatha.co.in)
अस्सल मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला (फोटो सौजन्य : gaatha.co.in)
मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. सिद्धार्थने रॉयल ब्लू कलरचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते.(फोटो सौजन्य : gaatha.co.in)
मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. सिद्धार्थने रॉयल ब्लू कलरचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते.(फोटो सौजन्य : gaatha.co.in)

मिताली आणि सिद्धार्थ या जोडीचे लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. आता लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नासाठी तयार होताना सिद्धार्थ चांदेकर (फोटो सौजन्य - सिनेगॉसिप इंस्टाग्राम पेज)
लग्नासाठी तयार होताना सिद्धार्थ चांदेकर (फोटो सौजन्य - सिनेगॉसिप इंस्टाग्राम पेज)
निळ्या रंगाच्या कुर्त्यात सिद्धार्थ आणि हिरव्या नऊवारीत मिताली सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य - सिनेगॉसिप इंस्टाग्राम पेज)
निळ्या रंगाच्या कुर्त्यात सिद्धार्थ आणि हिरव्या नऊवारीत मिताली सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य - सिनेगॉसिप इंस्टाग्राम पेज)
सिद्धार्थ मितालीच्या मेंदी सेरेमनीचा फोटो
सिद्धार्थ मितालीच्या मेंदी सेरेमनीचा फोटो