आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Adar Poonawala To Return: Serum Institutes CEO Adar Poonawala To Return To India Soon, Says Vaccine Production Is In Full Swing In Pune

लवकरच परतणार:पुण्यात कोव्हीशील्ड उत्पादन जोरात, लवकरच भारतात परतणार; धमक्या मिळाल्यानंतर सहकुटुंब ब्रिटनला गेलेले अदार पूनावाला यांचे आश्वासन

पुणे / लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सोडून सहकुटुंब ब्रिटनला गेलेले सीरम इंस्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांनी लवकरच भारतात परतणार असल्याचे आश्वासन दिले आहे. भारतात सीरमच्या कोरोनाविरोधी लसींबाबत त्यांना धमक्या मिळत होत्या. त्यानंतर त्यांनी सहकुटुंब भारत सोडून ब्रिटनला जाण्याचे ठरवले अशी चर्चा आहे. आता मात्र, त्यांनी भारतात परतण्याची तयारी सुरू केली आहे.

पुण्यातील व्हॅक्सीनचे उत्पादन जोरात
दरम्यान, ब्रिटनला पोहोचल्यानंतर त्यांनी तेथील माध्यमाला मुलाखत देऊन धक्कादायक खुलासे केले. आता मात्र, भारतात लवकरच परतणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. अदार पूनावाला म्हणाले, की "आमच्या पार्टनर्ससोबत ब्रिटनमध्ये झालेली मीटिंग यशस्वी ठरली आहे. पुण्यात कोव्हीशील्डच्या उत्पादनाचे काम जोरात सुरू आहे. मी लवकरच भारतात परतणार आहे. तेव्हा मी पुन्हा व्हॅक्सीनेशन उत्पादनाची पाहणी करणार आहे."

मुख्यमंत्र्यांसह बड्या लोकांकडून धमक्या

कोव्हीशील्ड बनवणाऱ्या सीरम इंस्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांनी लंडनला जाऊन तेथील टाईम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये आपल्याला भारतात धमक्या मिळत असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्यांच्या या खुलाशाने भारतात एकच खळबळ उडाली होती. मला फोन करून लोक धमक्या देत असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे हे फोन भारतातील प्रभावशाली व्यक्तींकडून केले जात असल्याचे ते म्हणाले. कॉल करणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री, इंडस्ट्री चेंबर्सचे प्रमुख आणि इतर अनेक बड्या लोकांचा समावेश आहे असे त्यांनी सांगितले. हे सगळेच मला फोन करून तत्काळ लस पुरवठा करण्याची मागणी करत आहेत.

प्रत्येकाला वाटते की, प्रथम लस मिळावी
मुलाखतीदरम्यान, पूनावाला यांनी फोन कॉलचा संदर्भ देत सांगितले की, सर्व लोकांना वाटते की, लस सर्वप्रथम मला मिळावी. परंतु, लोकांनी अशाप्रकारे धमकी देणे समजण्यापलीकडे असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भारत देशात माझ्यावर लस पुरवण्याबाबत प्रचंड दबाव आहे. लोक अशी अपेक्षा करतील असे वाटले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...