आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींच्या व्हॅक्सिन टूरनंतर मोठी बातमी:सीरम इंस्टीट्यूटचे CEO म्हणाले - 'पुढच्या दोन आठवड्यात कोवीशील्डच्या इमरजेंसी वापरासाठी अप्लाय करु'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील सीरम इंस्टीट्यू ऑफ इंडिया (SII) चे CEO अदर पूनावाला यांनी व्हॅक्सीनच्या तयारीविषयी माहिती दिली आहे.

कोरोना व्हॅक्सीनविषयी देशासाठी चांगली बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शनिवारी व्हॅक्सीन टूरनंतर पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) चे CEO अदर पूनावाला यांनी व्हॅक्सीनच्या तयारीविषयी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही पुढच्या दोन आठवड्यांमध्ये कोवीशील्डच्या इमरजेंसी वापरासाठी अप्लाय करु.

भारतात पाच व्हॅक्सीनवर काम सुरू आहेत. त्यापैकी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) कोवीशिल्ड तयार करत आहे. कोवीशिल्ड ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि फार्म कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी मिळून बनवली आहे. ही लस सध्या भारतात अंतिम टप्प्यात आहे.

आत्मनिर्भर भारतवर फोकस
पूनावाला यांनी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये म्हटले की, आम्ही आत्मनिर्भर भारताला लक्षात घेऊन काम केले. व्हॅक्सीनच्या फेज-3 च्या ट्रायलच्या प्रश्नावर पूनावाला म्हणाले की, आम्ही अजून प्रोसेसमध्ये आहोत. पंतप्रधानांनाही व्हॅक्सीन आणि प्रोडक्शनविषयी माहिती आहे. येणाऱ्या काळात आपल्या समोर रेग्युलेटरी सारखे चॅलेंज असतील.

400 मिलियन डोजवर विचार
सरकार किती डोज खरेदी करणार हे अजून ठरलेले नाही, पण असे वाटते की, हेल्थ मिनिस्ट्री जुलैपर्यंत 300 ते 400 मिलियन डोजवर विचार करत आहेत. कोव्हशील्डचा मृत्यूदर कमी करण्यातही फायदा होईल. यामुळे हॉस्पिटलायजेशन 0% होईल अशी अपेक्षा आहे. कोवीशील्डच्या जागतिक चाचणीत हॉस्पिटलाइजेशन 0% राहिले. विषाणूचा परिणाम 60% कमी होईल.

व्हॅक्सीनच्या ट्रायल दोनप्रकारे करण्यात आल्या

  • कोवीशिल्डच्या फायनल फेजच्या ट्रायल दोन प्रकारे करण्यात आल्या. पहिल्यामध्ये ही 62% प्रभावी दिसली. तर दुसरीमध्ये 90% पेक्षा जास्त प्रभावी होती. सरासरी, प्रभावीपणा सुमारे 70% आहे.
  • SII कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी नुकताच लसीचे उत्पादन सुरू केल्याचा दावा केला आहे. जानेवारीपासून दरमहा 5-6 कोटी लस तयार केल्या जातील. 8 ते 10 कोटी डोसचा साठा जानेवारीपर्यंत तयार होईल. शासनाची मंजुरी मिळाल्यावर पुरवठा सुरू केला जाईल.
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser