आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात ज्ञानेश्‍वर - तुकाराम स्मृती व्याख्यानमालाचे उद्घाटन:वैश्‍विक सत्याचे पालन केल्यास सृष्टीवर शांतता निर्माण होऊ शकते - प्रा. राम चरण

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सृष्टीवरील एनर्जीला घेऊन शक्तीशाली देशांमध्ये सुरू असलेला विवाद मानवाला असंतुष्ट करीत आहे. त्यातून कुटुंबात व देशात कलह वाढतांना दिसत आहे. अशा वेळेस मनाला शांत ठेऊन, आपल्या जीवनातील कालावधी कसा व्यक्तीत करता येईल. मानवता व आपले कर्तव्य काय या तीन वैश्‍विक सत्याचे पालन केल्यास सृष्टीवर शांतता निर्माण होऊ शकते असे मत अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक आणि जागतिक स्तरावरील व्यावसायिक सल्लागार प्रा. राम चरण यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि संतश्री ज्ञानेश्‍वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत 30 नोव्हेंबरपर्यंत आयोजित 27 वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालाचे उद्घाटन एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संतश्री ज्ञानेश्‍वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी अनामेय वैदिक आश्रमचे आध्यत्मिक गुरू स्वामी आशुतोष स्ट्रोबेल, रामकृष्ण मिशनचे स्वामी सम्पूर्णानंदजी, शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी, ग्लोबल मार्केटिंगचे उपाध्यक्ष संजय कामटेकर , एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, राहुल कराड हे उपस्थित होते.

डॉ. रामचरण म्हणाले, स्पर्धात्मक युगात प्रत्येक मानवाने आपले मन शांत ठेऊन कार्य करावे त्यातूनच रोजच्या जीवनात मानसिक समाधान आणि आनंद मिळतो. वर्तमान काळात युक्रेन, रशिया, तुर्की, सिरिया या देशातील विद्रोही स्थिती मानवाला दुःखाच्या खाईत ढकलत आहे.

भय, क्रोध, आळस, अहंकार, अवास्तव महत्वाकांक्षा आणि तृष्णा या सर्व गोष्टी मानवी दुःखाला कारणीभूत आहेत. एकमेकांवर विश्‍वास न ठेवणे हे विवादाचे मुख्य कारण आहे. मानव जातीला आत्मिक आनंदासाठी दररोज नवनवीन शिकण्याची गरज आहे. तसेच मनाला शांत ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात या गोष्टींची सवय लावून घ्या. तसेच एकमेकांवर विश्‍वास ठेवणे, सकारात्म विचारधारा असणे आणि भारतीय संस्कृतीचे पालन केल्यास मानवाचे कल्याण होईल.

स्वामी सम्पूर्णानंदजी म्हणाले, ज्ञानात शक्ती सामावलेली असते. त्यामुळे स्वामी विवेकानंद यांनी विज्ञानाची कास धरून अध्यात्म आणि ध्यानाच्या मार्गावर चालावे असे सांगितले. महाराष्ट्र ही संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज यांसारख्या संतांची भूमी आहे. त्यांनी सांगितलेल्या सत्याच्या ज्ञानाचे पालन केल्यास जीवनाचा खरा आनंद मिळेल.

स्वामी आशुतोष स्ट्रोबेल म्हणाले, सृष्टीवरील प्रत्येक प्राणीमात्रांना शांतीची गरज आहे. लोकसंख्येच्या 5 टक्के लोकांनी रोज योग व ध्यानधारणा केली तर त्याच्या सामर्थ्यांने समाजावर चांगले परिणाम दिसून येतील. या संदर्भात अमेरिका, चीन व अन्य देशांमध्ये असे प्रयोग केले जात आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जीवन उंचाविण्यासाठी आनंद सर्वात महत्वाचा आहे.

बातम्या आणखी आहेत...