आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 सप्टेंबरपासून वाहतुकीत बदल:पुण्यात गणेशोत्सव काळात सुरळीत वाहतुकीसाठी प्रशासनाची उपाययोजना

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहराचा वैभवशाली गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यात करोनामुळे दोन वर्षे बाप्पाचा उत्सव झाला नाही. त्यामुळे यंदाचा उत्सव धुमधडाक्‍यात साजरा होणार हे निश्‍चित. त्यातच भाविकांची मोठी गर्दी शहरात होणार. यापुर्वी शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षेची उपाययोजना तसेच वाहतुक कोंडी यामुळे विविध रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

  • 1 सप्टेंबरपासून गणपती विसर्जनापर्यंत वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. दुपारी तीन ते गर्दी संपेपर्यंत हा बदल राहिल.
  • शिवाजीनगरवरुन स्वारगेट कडे जाणाऱ्या वाहनांनी - स. गो. बर्वे चौक-जे. एम. रोड-अलका चौक-टिळक रोड किंवा शास्त्री रोडचा वापर करावा किंवा सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख चौक - बोल्हाई चौक मार्गे नेहरु रोडचा वापर करुन स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा.
  • गर्दीची परिस्थीती पाहून पीएमपीएमएल बसेस या वरीलप्रमाणे वळविण्यात येतील. चारचाकी वाहन चालकांनी शिवाजीनगरवरून स्वारगेटला जाण्यासाठी वरील मार्गाचा वापर करता येईल. चारचाकी वाहनांना गाडगीळ पुतळा ते शाहीर अमर चौक व पुढे नेहरू रोडने स्वारगेटकडे जाता येईल.
  • जिजामाता चौक ते फुटका बुरज येथून उजवीकडे वळून शनिवारवाड्या पासून नदीपात्रातील रस्त्याने (चंद्रशेखर आपटेरोड) भिडेपूल जंक्‍शनवरुन अलका चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.
  • लक्ष्मी रोडवरील चारचाकी वाहन चालकांना बेलबाग चौकातून डावीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे.
  • पर्यायी मार्ग म्हणून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीरोडवरुन हमजेखान चौकातून डावीकडून वळून महाराणाप्रताप रस्त्याने जावे.

आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. दरम्यान, या रस्त्यावरील वाहनांना पर्यायी मार्ग हा बाजीराव रोड, केळकर रस्त्यावरील वाहनांनी अप्पा बळवंत चौक डावीकडे वळून बाजीराव रोडने फुटका बुरूज मार्गे गाडगीळ पुतळा चौक. उजवीकडे वळून जिजामाता चौक, डावीकडे वळून गणेश रोडने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक उजवीकडे वळून हमजेखान चौक सरळ महाराणाप्रताप मार्गावरुन गोविंद हलवाई चौक उजवीकडे वळून गोटीराम भैया चौक डांवीकडे वळून शिवाजीरोडने स्वारगेटकडे जावे.

नो-पार्किंग बाबत

शिवाजी रोडवर जिजामाता चौक ते बेलबाग चौक ते रामेश्वर चौक उजवीकडे वळून मंडई ते शनिपार चौक उजवीकडे सेवासदन चौक ते आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्कींगसाठी मनाई राहील. तसेच आवश्‍यकता भासल्यास या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशास मनाई राहील.

बातम्या आणखी आहेत...