आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार:पुणे विद्यापीठामधील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 15 जूनपासून सुरू होणार

पुणे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये सुरू असलेल्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 15 जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना दि.17 जुलैपर्यंत अर्ज करता येईल. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा साधारण 20 जुलैनंतर होण्याची शक्‍यता आहे. याबाबतचे परिपत्रक येत्या एक-दोन दिवसात जाहीर होणार आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया येत्या दि. 15 जून ते 17 जुलै या कालालवधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. या अर्जांची पडताळणी केल्यानंतर, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आणि प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध होणार आहे. पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये 13 पदवी अभ्यासक्रम सुरू असून, त्यासाठीची परीक्षा केवळ एकच दिवस राहणार आहे. तर, इतर दिवशी पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा विविध सत्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

अर्ज संख्या वाढण्याचा अंदाज

पुणे विद्यापीठाने गेल्या काही वर्षात अनेक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले आहेत. पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी साधारण अडीच हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांचे शुल्क इतर खासगी विद्यापीठे आणि कॉलेजांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी अर्ज करतात. त्याचप्रमाणे रोजगाराची संधीही उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी या प्रवेश प्रक्रियेत 30 हजारांपेक्षा अधिक अर्ज आले होते.

बातम्या आणखी आहेत...