आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅड. प्रकाश आंबेडकर म्‍हणाले:अर्थसंकल्पाबाबत काँग्रेस तटस्थ भूमिका मांडत नाही

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुर्दैवाने काँग्रेस पक्षाने अर्थसंकल्पावर जे भाष्य केले त्यातून त्यांनी मौन बाळगल्याचे दिसून येते. आपण श्रीलंकेच्या मार्गावर जात आहोत का असे वातावरण निर्माण होते आहे. याबाबत अर्थतज्ज्ञांनी खरी भूमिका नागरिकांना समजावून सांगितली पाहिजे. काँग्रेस पक्षाकडे अर्थतज्ज्ञांची कमतरता नाही, परंतु ते अर्थसंकल्पाबाबत तटस्थ भूमिका मांडताना दिसत नाहीत. केवळ गोड भाष्य करतात. आगामी काळातील विविध राज्यांतील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. भाजपकडून त्यांना जे राज्य प्रतिसाद देत नाही त्यांना बजेटमधील तरतुदी दिल्या जात नाहीत, असे दिसून आल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आंबेडकर म्हणाले, अर्थसंकल्पात सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा केंद्र सरकारच्या तिजोरीत किती पैसे येणार आहे. हे पाहता येणारे उत्पन्न २७ लाख कोटी आहे. जो शासनाचा खर्च आहे, तो ४५ लाख तीन हजार ८७ लाख कोटी आहे. ही तफावत ही १८ लाख कोटींची आहे.

मनरेगातून ४० दिवस काम जे लोक गरिबीच्या रेषेवर उभे आहेत त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अर्थसंकल्पात काही करण्यात आले नाही. मनरेगामधील गुंतवणूक सरकारने कमी केल्याने पूर्वी जे १०० दिवस काम मिळत होते आता ते ४० दिवसांवर आल्याने लोकात असंतोष आहे. परदेशी गुंतवणूकदार आपले गुंतवणूक पैसे काढत आहेत. त्यामुळे शासनाला अर्थसंकल्प चालवण्यासाठी आवश्यक निधी लागतो. तो तरी उपलब्ध होईल का, अशी शंका आहे.

बातम्या आणखी आहेत...