आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात घातपाती कारवाया:आफताब शाहच्या कोठडीत विशेष न्यायालयाकडून दोन दिवसांची वाढ, तपास निर्णायक स्थितीत

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘लष्कर-ए-तोयबा’ दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन जम्मू-काश्मीरमधील किश्तवार येथून अटक केलेल्या आफताब हुसैन शाहच्या पोलिस कोठडीत विशेष न्यायालयाने मंगळवारी दोन दिवसांची वाढ केली. या प्रकरणाचा तपास निर्णायक स्थितीत आहे, असे ‘एटीएस’ने न्यायालयात सांगितले.

यापूर्वी पुण्यातील दापोडीतून अटक केलेल्या जुनैदच्या बँक खात्यात दहा हजार रुपये पाठविणाऱ्या तरुणास राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जम्मू-काश्मीरमधून अटक केली. पुण्यातील विशेष न्यायालयाने त्याला 21 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मोहम्मद युसूफ मोहम्मद शाबान अत्तू (वय 31, रा. पोस्ट दलयोग, उधियानपूर, जि. डोंडा, जम्मू-काश्मीर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यविरोधात मुंबईतील काळा चौकी पोलिस ठाण्यात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 121 (अ), 153 (अ), 116, 201आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात घातपाती कारवाया घडविण्यासाठी ‘लष्कर-ए-तोयबा’ दहशतवादी संघटनेत भरती आणि ‘टेटर फंडिंग’च्या संशयावरून ‘एटीएस’ने यापूर्वी जुनैद महंमद अता महंमद (वय 28, रा. दापोडी, मूळ रा. गोंधनपूर, जि. बुलडाणा), आफताब हुसैन अब्दुल जब्बार शाह (वय 28, रा. किश्तवाड, जम्मू-काश्मीर), इनामूल हक उर्फ इनामूल इम्तियाज (वय 19, रा. पाटणा, गिरडीह, झारखंड, सध्या रा. देवबंद, सहारनपूर, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे, तर आणखी दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपीने मोहम्मदमार्फत जुनैदच्या बँक खात्यात 10 हजार रुपये पाठविले आहेत. हे पैसे कशासाठी पाठविले, मुख्य आरोपी आणि मोहम्मदमध्ये काय संबंध आहेत. याचा तपास करण्यासाठी आरोपीची पोलिस कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असे ‘एटीएस’तर्फे न्यायालयात सांगण्यात आले. बचाव पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायालयाने आरोपी मोहम्मदला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बातम्या आणखी आहेत...