आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी शुक्रवारी तब्बल दहा वर्षांच्या कालावधीनंतर पुणे महानगरपालिकेत दाखल झाले. अनेक वर्षांनंतर प्रथमच कलमाडी मनपात आल्याने चर्चा रंगली. पुणे मनपा निवडणुकीपूर्वी कलमाडी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार का, याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी पुण्यात सुरू असलेली मेट्रोची कामे व रस्ते विकासकामेही पूर्ण करून घ्यावी. तसेच या कालावधीत श्री गणेश कलाक्रीडा रंगमंच, बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी ३४ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन व सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या परिसरातीलही मेट्रो व रस्ते विकासकामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करून घ्यावी. या कालावधीत पुणेकर नागरिकांना वाहतूक कोंडी व अन्य त्रास होऊ नये यासाठी ही कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करणे गरजेचे असल्याचे निवेदन पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष व माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी शुक्रवारी पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांना भेटून दिले.
तसेच पुण्याचा नावलौकिक जगभर नेणाऱ्या व जागतिक पर्यटन नकाशावर पुण्याचे नाव ठळकपणे आणणाऱ्या पुणे फेस्टिव्हलला मनपाने सहप्रायोजकत्व द्यावे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेने पुणे फेस्टिव्हलसह सर्व प्रभागांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे कलमाडी यांनी म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.