आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परराज्यातून कुरिअरने तलवारी:औरंगाबादनंतर पुण्यातही आल्या कुरिअरने तलवारी, पंजाबमधील लुधियाना येथून मागवण्यात आल्या तलवारी

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो  - Divya Marathi
फाईल फोटो 

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे कुरिअरने परराज्यातून मोठ्या प्रमाणावर तलवारी आल्याचा प्रकार समोर आला होता. त्याच धर्तीवर पुण्यात कुरिअरने शुक्रवारी संध्याकाळी दोन तलवारी आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी कुरिअर कार्यालयातून जाऊन तपासणी केली असता पार्सलमध्ये दोन धारदार तलवारी पोलिसांना सापडल्या. जप्त करण्यात आलेल्या तलवारी पंजाबमधील लुधियाना येथून मागवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

ज्यांच्या नावे या तलवारी आल्या होत्या त्यांच्याकडे सध्या या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...