आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • After Becoming The Chief Minister, I Thought Systematic Work Would Be Done, But On The Contrary, The Occupation Increased More CM Eknath Shinde

सीएम शिंदेंनी अखेर सांगून टाकलं!:''मुख्यमंत्री झाल्यावर मला वाटलं पद्धतशीर काम होईल, पण उलट व्याप जास्त वाढला''

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकार म्हणायचे तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस दोघेच सरकारमध्ये आहात, तोपर्यंत निर्णय घ्या. दुसरे आल्यानंतर निर्णय घेताना समस्या येतील. मग आम्ही निर्णय घेताना मी आणि देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळ चालवतात. अशा बातम्या येऊ लागल्या. मुख्यमंत्री झाल्यावर मला वाटलं की पद्धतशीर काम होईल, पण झाले उलटेच. आता व्याप जास्त वाढला, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ यांनी आज दिली.

मनात काहीच ठेवत नाही

मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यावेळी त्यांनी दिलखुलासपणे जे बोलायचे होते ते बोलून टाकले. ते म्हणाले, चार महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांना बातमीचा मसाला दिला. ते का घडलं? का केलं हे सर्वांनाच माहीतच आहे. मी मनात काही ठेवत नाही.

नेते, पत्रकारांत साम्य

एकनाथ शिंदे म्हणाले की, राजकीय मंडळींचे आणि पत्रकारांचे काही बाबतीत साम्य असते. त्यांना कुटुंबाला म्हणावा तितका वेळ देता येत नाही. मीडियात मोठा बदल होत असल्याने पत्रकारांची जबाबदारी वाढलेली आहे. सोशल मीडियाने बातमीची सत्यता पडताळणी हे एक मोठे आव्हान पत्रकारांसमोर उभे आहे. सोर्स वाढल्याने अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. तो तुम्ही काही प्रमाणात काढताना दिसत आहात.

माझा स्वभाव भेटणाऱ्यांना माहितेय

सीएम शिंदे म्हणाले, प्रत्येक बातमी आमच्याच बाजूने द्या असा आमचा आग्रह नाही. पण, चांगले काम केले तर ते द्या. चुका दिसल्यास त्या निदर्शनास येणे गरजेचे आहे. ते काम तुम्ही करता. काहींचा समज-गैरसमजअसतो. प्रत्यक्षात भेटल्यानंतर मनातील अडी दूर होते. जे भेटतात त्यांना माझा स्वभाव माहीत आहे. तुम्हीही माझ्या संपर्कात आले की लक्षात येईल.

कोंडी सुटली, प्रश्न सोडवू

एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील चांदणी चौकाचा प्रश्न आपण मार्गी लावत असल्याचे सांगितले. आमचा ताफा चांदणी चौकातून जाताना मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यावेळी काही लोकांनी माझ्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर मीही लगेचच तातडीने कारवाईचे आदेश दिले. तो पूल पाडला कोंडी फूटली. मुंबईतही वाहतूक कोंडी होते, त्यामुळे आम्ही मेट्रोला मोठी चालना देत आहोत. मेट्रो सर्वत्र सुरू झाली, की आपोआप मार्गांवर वाहने कमी होतील.

बातम्या आणखी आहेत...