आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:लग्न कर नाही तर, औषध पिऊन जीवच देतो; ब्रेकअप झालेल्या प्रियकराची तरुणीला धमकी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीच्या आई-वडीलांना शिवीगाळ केल्यानंतर तीने त्याच्याशी असलेले प्रेम संबंध तोडून टाकले. माझ्याशी लग्न कर नाही तर, तुझे लग्नच होऊ देणार नाही, माझ्याशी लग्न केले नाही तर औषध पिऊन जीवच देतो, अशी धमकी ब्रेकअप झालेल्या तरुणाने तरुणीला दिल्याचा प्रकार घडल्यानंतर याबाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विष्णु विठ्ठल शिंदे (23, रा. भोगलवाडी, जि. बीड) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. याबात एका 20 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. आरोपी विष्णु मुंडे याचे फिर्यादी तरूणीबरोबर प्रेमसंबंध होते. परंतु, विष्णु याने तरूणीच्या आई-वडीलांना शिवीगाळ केल्याने तिने त्यांच्याबरोबर असलेले प्रेमसंबंध तोडून टाकले.

पीडित मुलगी तिच्या बहीणीच्या घरी राहत असताना विष्णुने तिचा पाठलाग करून तिला माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच तु लग्नच कसे करते बघतो, असे बोलून तिच्या बहीणीला शिवीगाळ केली. तिने लग्न न केल्यास औषध पिऊन जीव देण्याची धमकी त्याने तरूणीला दिली. तरूणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात याबाबत धाव घेतल्यानंतर त्याच्यावर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...