आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लॉट खरेदी:कोरोनानंतर फ्लॅटपेक्षा प्लॉट खरेदीस ग्राहकांची वाढती पसंती : नाईकनवरे

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यात स्वतःचे सुसज्ज घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे शहरी भागात मर्यादा येत असल्याने अनेकांना फ्लॅट घ्यावे लागतात. मात्र, कोरोनानंतर ‘वर्क फ्रॉम होम’चे प्रमाण वाढल्याने फ्लॅट पेक्षा ग्राहकांचा कल प्लॉट खरेदीत वाढत असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिक रणजीत नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाईकनवरे म्हणाले, पुणे शहरात दरवर्षी साधारण एक ते सव्वा लाख फ्लॅटची विक्री होत असते. मात्र, शहरी भागात प्लॉटची संख्या मर्यादित असल्याने मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना जागा विकत घेण्यास अडचणी जाणवत आहेत. मध्य मार्ग म्हणून अनेक जण मूळ जागा मालकाशी करार करून, जागा विकसित करून गृह प्रकल्प विक्री करण्याचा प्रयत्न करतात. पुणे शहराच्या जवळील परिसरात मोकळ्या प्लॉटची खरेदी करत आहेत. बांधकाम व्यावसायिकांकडून मोठ्या गृह प्रकल्पाच्या परिसरात मागील दोन वर्षापासून प्लॉटिंग विक्री सुरू करण्यास पसंती देत आहेत.