आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:पाेलिसांत तक्रार दिल्याने घरात शिरून महिलेवर वार; एका महिलेचा विनयभंग

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वानवडी परिसरातील लुल्लानगर येथील डिफेन्स काॅलनीत राहणाऱ्या दोन महिलांवर घरात घुसून वार करण्यात आले. महिलांच्या तक्रारीवरून आरोपी काळू सपकाळ (२७) याच्यावर वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, ५५ वर्षीय आणि ४० वर्षीय २ बहिणी ७ डिसेंबरला रात्री घरात झाेपल्या हाेत्या. त्या वेळी जुन्या वादातून आराेपी सपकाळने महिलांच्या घराच्या दरवाजाची कडी ताेडून घरात प्रवेश केला. त्याने ५५ वर्षीय महिलेच्या पाेटात हत्याराने ३ वेळा भोसकत त्यांना गंभीर जखमी केले.

बातम्या आणखी आहेत...