आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी श्वान आणण्यापूर्वीच चोरांनी केले काम फत्ते!:पुण्यात श्वान खरेदीसाठी गेल्यानंतर घर फोडून लांबवले 15 लाखांचे 45 तोळे सोने

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या श्वानामुळे घराची रखवाली होते तो श्वान आणायला गेल्यानंतर चोरांनीही डाव साधला अन् घरात घुसून एक दोन नव्हे तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल चोरला. ही घटना पुण्यातील बिबवेवाडी परिसरात आज उघडकीस आली. याप्रकरणी बिबवेवाडी पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीप्रकरणी प्रवीण रमेश कांडपिळे (वय 48) यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली. प्रवीण कांडपिळे हे बिबवेवाडी परिसरात सवेरा अर्पाटमेंट याठिकाणी राहतात. 20 जून राेजी दुपारी चार ते सात वाजण्याच्या दरम्यान ते पुणे शहरातच एके ठिकाणी कुत्रा खरेदी करण्यासाठी कुटुंबा समवेत गेले हाेते. त्यावेळी चोरांनी त्यांच्या घराच्या गॅलरीचे लाेखंडी ग्रील ताेडुन आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुम मधील कपाटातील 45 ताेळे 9 ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने व राेख रक्कम असा एकूण 15 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरला.

सदर कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा उघडून आत आल्यानंतर बेडरुम मधील कपाटातील दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी पाेलिसांना माहिती दिली, बिबवेवाडी पाेलिस घटनास्थळी दाखल हाेत त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात येत आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक प्रवीण काळुखे करत आहे.

दुसऱ्या घटनेत काेंढवा परिसरात सारा रेसीडन्सी येथे चाैथ्या मजल्यावर राहणारे इजलाल इकबाल अहमद (वय-34)हे 18 ते 20 जून राेजी कामानिमित्त कुटुंबा समवेत घराबाहेर गेले हाेते. त्यावेळी अज्ञात चाेरटयाने त्यांचे बंद घराचे बाथरुम मधील खिडकीच्या काचा ताेडुन व बाथरुमचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सुटकेस मधील 7 ग्रॅम साेने, 25 ताेळे चांदी व राेख रक्कम असा 56 हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरुन नेला. याबाबत काेंढवा पाेलीस पुढील तपास करत आहे.