आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाब मधील प्रसिध्द गायक सिध्दू मुसेवाला हत्या प्रकरणानंतर लाॅरेन्स बिश्णाेई टाेळीतील संशयित आराेपी संताेष जाधव याने त्याच्या महाराष्ट्रातील टाेळीतील सदस्यांना मुसेवालाची हत्या आणि त्याबाबत संशयित संताेष जाधवचे समाेर आलेले नाव यासंर्दभातील व्हिडिओ फाेटाे, रिल्स साेशल मिडियावर माेठया प्रमाणात व्हायरल करा, असे मॅसेज सिग्नल अॅपच्या माध्यमातून केल्याची बाब पाेलिस चाैकशीत उघडकीस आली आहे.
संताेष जाधव याने लाॅरेन्स बिष्णाेई टाेळीच्या संर्पकात आल्यानंतर साेशल मिडियाचा वापर गुन्हेगारीकरिता कशाप्रकारे करावयाचे याचे तंत्र आत्मसात केले. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील मंचर, घाेडेगाव, नारायणगाव परिसरात स्वत:चे टाेळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे दृष्टीने त्याने मागील अडीच ते तीन वर्षापासून प्रयत्न सुरु केले. गुंडगिरीला प्रतिष्ठा, आर्कषण प्राप्त करुन देण्यासाठी त्याने त्याचे जवळचे साथीदारांना कामाला लावले. याद्वारे टाेळीचा दबदबा निर्माण करत पिस्टलचे माध्यमातून स्वत:ची दहशत निर्माण करुन खंडणी गाेळा करण्याचे सत्र सुरु केल्याची माहिती ही उघडकीस येऊ लागली आहे. यासंर्दभात नारायणगाव पाेलिस ठाण्यात एका वाॅटर प्लांट व्यवसायिकास जाधव याने पाच ते सहा महिन्यापूर्वी व्हाॅटसअप काॅल करुन 50 हजार रुपये हप्ता मागून, हप्ता न दिल्यास गाेळ्या घालून जीवे ठार मारु, अशी धमकी दिल्याची तक्रार जाधव याला अटक केल्यानंतर केली आहे.
साेशल मीडियाची 100 संशयित खाती मिळाली
पुणे ग्रामीण पाेलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी सांगितले की, संताेष जाधव प्रकरणाच्या तपासात त्याच्या संर्पकातील 100 संशयित साेशल मीडिया खाती मिळून आली असून त्यांचा तपास करण्यात येत आहे. लाॅरेन्स बिष्णाेई टाेळी त्यांच्या प्रचारास साेशल मीडियाचा प्रामुख्याने वापर करते. तेच तंत्र जाधवनेही वापरणे सुरु केले. त्याच्या संर्पकात चांगल्या घरातील ही काही मुले-मुली आढळून आली आहे. त्यामुळे अशा मुलांच्या पालकांचे समुपदेशनही पाेलिसांकडून करण्यात येईल. कमी वयात तरुणाईला गुन्हेगारीचे आर्कषण असते मात्र, त्याचे ताेटे नंतरच्या काळात पुढे येतात त्यामुळे वेळीच पालकांनी मुलांवर लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.