आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील कसबा पेठ व चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांतील भाजप आमदार अनुक्रमे मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे या दोन्ही रिक्त जागांसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या जागांवर टिळक व जगताप कुटुंबातील सदस्यालाच संधी द्यावी, अशी मागणी पक्षातून होत होती. शुक्रवारी भाजपने जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना चिंचवडचे तिकीट देत न्याय दिला. मात्र कसबा पेठेतून इच्छुक असलेले मुक्ता टिळक यांचे पती शैलेश व मुलगा कुणाल यांना डावलून पक्षाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासनेंना तिकीट जाहीर केले. त्यामुळे टिळक कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महाविकास आघाडीनेही दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर चिंचवड येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल कलाटे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.
मुक्ता यांच्या कामावर, ब्राह्मणांवरही अन्याय मुक्ता यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही उमेदवारी मागितली होती. पण भाजपने दिली नाही. हा मुक्ता यांच्या कामावर अन्याय आहे. पुण्यात एकही ब्राह्मण उमेदवार नाही ही अन्यायाची भावना समाजातही आहे. पण आम्ही भाजपसोबत राहू. - शैलेश टिळक, मुक्ता यांचे पती
निवडणूक बिनविरोध नसल्यामुळे हे उमेदवार पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नसल्याने पक्षाने या दोघांना उमेदवारी दिली. टिळक कुटुंबीयांशी आधीच चर्चा केली आहे. कुणाल यांना प्रवक्तापद दिले आहे. शैलेश यांनाही योग्य स्थान देऊ. जगताप कुटुंबीयांतही कुठलाही वाद नाही. - चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशा होतील लढती हेमंत रासने (भाजप) पुणे मनपात चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष, सुवर्णयुग बँकेचे अध्यक्ष , दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त
रवींद्र धंगेकर (काँग्रेस) शिवसेनेकडून दोनदा, मनसे व काँग्रेसकडून प्रत्येक एकेका वेळी नगरसेवक. विधानसभेचे तिकीट २०१९ मध्ये मिळाले नाही.
अश्विनी जगताप (भाजप) लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी, प्रतिभा महिला प्रतिष्ठान अध्यक्षा, प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात.
राहुल कलाटे (राष्ट्रवादी) तीन वेळा नगरसेवक, २०१४ शिवसेनेकडून विधानसभा लढवली पण पराभूत. २०१९ मध्ये जगताप यांच्याविरोधात पराभूत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.