आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरटा पसार:घरफोडीनंतर सदनिकेत आग लावून चोरटा पसार पुण्यातील घटना, दोन लाखांचा ऐवज लांबवल,

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटातील रोकड आणि दागिने असा २ लाख रुपयांचा ऐवज लांबवला. विशेष म्हणजे चाेरट्याने चोरी केल्यानंतर सदनिकेत आग लावून तो पसार झाला. ही घटना महात्मा फुले पेठेत घडली.

अशोक भोई (६९, महात्मा फुले पेठ, पुणे) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोई कुटुंबीय जम्मूमधील वैष्णोदेवी मंदिरात दर्शनाला गेले होते. चोरट्याने सदनिकेचे कुुलूप तोडले. सदनिकेतील कपाटातून रोकड, दागिने, मालमत्तेची कागदपत्रे लांबवली. त्यानंतर सदनिकेत आग लावून चोरटा पसार झाला. सदनिकेत आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर रहिवाशांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. रहिवाशांनी भोई यांना या घटनेची माहिती दिली. आगीमुळे भोई यांच्या सदनिकेतील गृहोपयोगी वस्तू जळाल्या. भोई कुटुंबीय देवदर्शनावरून घरी परतले तेव्हा घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

बातम्या आणखी आहेत...