आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • After The Death Of Mete State Level Meeting Of Shiv Sangram | Head Of The Family | Shivsangram Not Leave The Family| Jyoti Mete's Word

मेटेंच्या मृत्यूनंतर शिवसंग्रामची राज्यस्तरीय बैठक:कुटुंबप्रमुख म्हणून शिवसंग्राम कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, ज्योती मेटेंचा शब्द

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जी दुःखाची व काहीशी नैराश्याची भावना निर्माण झाली त्यासाठी डॉ. ज्योती मेटे यांनी रिक्त झालेले राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे हा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. कुटुंबप्रमुख म्हणून शिवसंग्राम कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द ज्योती मेटे यांनी दिला.

तसेच महायुतीतील मित्रपक्ष म्हणून भाजपने मेटे यांना विधानपरिषदेसह मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता. आता त्याचे पालन करत डॉ. ज्योती मेटे यांना विधानपरिषद व मंत्रीपद मिळणे हा आमचा हक्क देऊन भाजपने वचनपूर्ती करावी हा ठरावही यावेळी एकमुखाने पारित करण्यात आला.

कार्यकर्ता कटिबद्ध असेल

विनायक मेटे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शिवसंग्राम संघटनेची प्रथमच राज्यस्तरीय बैठक पुणे येथे संपन्न झाली. मेटे यांनी मराठा आरक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक, शेतकरी पेन्शन योजना आदी. बाबींसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या माघारी हतबल न होता डॉ. ज्योती मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली दुप्पट जोमाने सदर विषय सोडविण्यासाठी शिवसंग्रामचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता कटिबद्ध असेल हा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला.

मंत्रीपद दिलेच पाहिजे

तसेच राज्यभर दौरा करून पुन्हा चैतन्य निर्माण करण्यासाठी मेळावे घेणार असल्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. स्व.मेटे यांना भारतीय जनता पक्षाने शब्द दिला होता आता डॉ. ज्योती मेटे यांना विधानपरिषद व मंत्रीपद दिलेच पाहिजे असा ठराव पारित करण्यात आला. विधानपरिषद व मंत्रीपद हा मित्रपक्ष या नात्याने आमचा हक्क असल्याची ठाम भूमिका अनेकांनी मांडली.

कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही

मनोगत व्यक्त करताना डॉ.ज्योती मेटे म्हणाल्या की साहेब हे स्वतःच्या कुटुंबाप्रमाणेच शिवसंग्रामला आपले कुटुंबच मानत होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर, त्यांची उत्तराधिकारी म्हणून कुटुंबप्रमुख ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे व मी या शिवसंग्रामचा माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांच्या बळावर मी मेटे साहेबांचे अर्धी राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारणार

डॉ. ज्योती मेटे यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे तसेच विधान परिषदेचे सदस्यपद व मंत्रीपद काम करावे या सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीला त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. काही कायदेशीर बाबींमुळे लवकरात लवकर त्या त्यांचा होकार कळवणार आहेत.

यांची होती उपस्थिती

या बैठकीसाठी शिवसंग्राम गुजरातचे प्रदेशाध्यक्ष मनीष पगार, राज्याचे सरचिटणीस विक्रांत आंब्रे, उपाध्यक्ष संदीप पाटील, राजन घाग, युवकाध्यक्ष उदय आहेर, धुळे जि.प.सदस्य ज्ञानेश्वर भामरे, बीडचे अप्पा कोलंगडे, प्रदेश सचिव शेखर पवार, प्रवक्ते प्रफुल्ल पवार आदींसह राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख हजर होते अशी माहिती शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...