आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिंदेंचा गावाकडं दौरा:सत्तासंघर्षानंतर स्ट्रॉबेरीच्या शेतात निवांत फेरफटका, जनावरांना घातला चारा अन् इकार्डमधून राईडही

महाबळेश्वरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांचे हित जोपासणारे सरकार अन् आत्महत्यामुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्नशिल असल्याचे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही स्वःत शेतकरी कुटुंबातील आहेत. ते महाबळेश्वर तालुक्यातील मुळ गावी दरे बुद्रुक येथे दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या गावातील शेतात आज दिवसभर फेरफटका मारून शेतपाहणीही केली.

जनावरांना घातला चारा

जनावरांना चारा खाऊ घालताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
जनावरांना चारा खाऊ घालताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

आज दिवसभर महाबळेश्वर तालुक्यातील दरे बुद्रुक या मूळ गावी स्ट्रॉबेरीच्या शेतात तसेच जनावरांच्या गोठ्यात आणि परिसरात फेरफटका मारण्यात आनंद लुटला. यावेळी त्यांनी ईकार्टमधूनही फेरफटका मारला.

इकार्टमधून फेरफटका मारताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इकार्टमधून फेरफटका मारताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात शिंदे सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर बरेच दिवस ते गावी जाऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी गत काही महिन्यातील सत्तासंघर्षाच्या धबडग्यातून थोडी उसंत घेत दरे बुद्रुकमध्ये क्षण घालवले.

शेतातील पीकांची पाहणी करीत फेरफटका मारताना सीएम शिंदे.
शेतातील पीकांची पाहणी करीत फेरफटका मारताना सीएम शिंदे.

ग्रामदैवताच्या चरणी लीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवशीय सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री या दौऱ्यात त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळ गावी जाऊन ग्रामदैवत असलेल्या उत्तरेश्वरचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळ गावी ग्रामदैवत उत्तरेश्वरच्या चरणी लीन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळ गावी ग्रामदैवत उत्तरेश्वरच्या चरणी लीन.

सासुरवाडीलाही गेले

मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी आले होते, परंतु पावसामुळे ते ग्रामदैवताच्या मंदिरात जाऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी काल रात्री मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी व जनतेला सुखी समाधानी ठेव यासाठी उत्तरेश्वराकडे साकडे घातले असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच उत्तरेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. दरे बुद्रुकच्या शेजारीच असलेल्या त्यांच्या सासुरवाडीच्या गावीही मुख्यमंत्री जाऊन आले.

बातम्या आणखी आहेत...