आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:टीव्ही मालिका पाहून दोन मुलांनी केला वृद्धेचा खून, घरातील सोने व रोकड चोरून नेले

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्हीवरील गुन्हेगारीशी संबंधित मालिका पाहून त्यातील घटनेसारखा बनाव रचत दोन अल्पवयीन मुलांनी सिंहगड रस्त्यावरील ज्येष्ठ महिलेचा खून केल्याचे तपासात उघड झाले. या दोघांनी टी.व्ही. पाहत बसलेल्या वृद्धेला मागून धक्का देत पाडले. यानंतर तिचे तोंड, नाक दाबून तिचा खून केला आणि घरातील किंमती ऐवज चोरला. घटनास्थळी बोटांचे ठसे उमटू नयेत, म्हणून दोघांनी हातमोजेही वापरले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणे खुर्दच्या सायली हाइट्‌स याठिकाणी ३० ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ महिलेचा खून करून घरातील सोने व रोकड चोरून नेले होते. शालिनी बबन सोनवणे (७०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

घटनास्थळी सीसीटीव्ही तसेच प्रत्यक्षदर्शी नसल्याने गुन्हेगारांचा माग काढणे कठीण होते. दरम्यान, (५ नोव्हेंबर) मंगळवारी पोलिस अंमलदार उज्ज्वल मोकाशी यांना परिसरातील लहान मुलांकडून माहिती मिळाली की, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी पाणीपुरी खायला जाताना त्यांचे दोन मित्र घाईगडबडीने घरी आले होते. यावरून परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, तसे दिसून आले. त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेत विचारपूस केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...