आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए:एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील समर्थ, खडक आणि कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत खुन, जबरी चोरी यासह घातक शस्त्र बाळगून परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारावर पोलिस आयुक्तांनी एमपीडीए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश दिले आहे. शहरातील एमपीडीए कायद्यान्वये ही 75 वी कारवाई आहे.

फिरोज उर्फ बबाली मकबुल खान (रा. आयना मस्जिद समोर, ए.डी. कॅम्प चौक, भवानी पेठ) असे कारवाई केलेल्या आरोपीचे नाव आहे. खान हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यासह साथीदारांवर समर्थ, खडक आणि कोंढवा पोलिस ठाण्यात कोयते, सुरा, चाकू, तलवार या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घातक शस्त्रासह गंभीर दुखापत करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धमकावणे. दुखापत, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

मागील पाच वर्षामध्ये त्याचेविरुध्द 9 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते. याबाबत प्राप्त प्रस्तावानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही स्थानबध्दतेचे आदेश दिले. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पीसीबी वरिष्ठ निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी कामगिरी पार पाडली.

कोंढव्यात एटीएम मशीनमध्ये चोरीचा प्रयत्न

कोंढव्यातील कडनगर चौकाजवळ महमंदवाडी येथे तळमजल्यात असलेल्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन कटरने कापून मशीन मधील रक्कम चोरून नेल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 6 सप्टेंबरच्या पहाटे साडेचारच्या सुमारास उघडकीस आला आहे. याप्रकरणात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्वर तांबोळी (39, रा. हडपसर,पुणे) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...