आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांच्या जीवास धोका:केंद्रीय तपास यंत्रणाची महाराष्ट्र पोलिसांना माहिती; संरक्षण देण्याची मागणी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राह्मण महासंघाचे नेते आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जीवास धोका असल्याची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पाेलिसांना कळवली आहे. याबाबत केंद्रीय तपास यंत्रणाच्या अधिकाऱ्यांनी दवे यांची भेट घेऊन त्यांना सुरक्षित रहाण्याचा सल्ला दिलाय. यानंतर दवे यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

उदपूरप्रमाणे घडू नये

केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पाेलिसांना याबाबत कळवले असून, उदयपूर प्रमाण पुण्यात काही घडू नये यासाठी पुणे पाेलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत दवे म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणेने माझ्या जीवाला धाेका असल्याचे सांगत सुरक्षित रहाण्यास सांगितले आहे. याबाबतच्या काही सूचना त्यांनी दिल्या असून, पाेलिस संरक्षणाची मागणी करा असे सांगितले. त्याप्रमाणे पुणे पाेलिस आयुक्तलयातील विशेष शाखेचे पाेलिस उपायुक्त यांना अर्ज करून पाेलिस संरक्षण तात्काळ मिळावे अशी मागणी केली आहे.

संजय राऊतांचे ट्विट

दवे म्हणाले की, मुस्लिम मूलत्ववादी संघटनांच्या रडारवर माझे नाव आले आहे. मात्र, अशाप्रकारच्या धमक्या आल्या तरी माझे नियतीने साेपवलेले कार्य मी एक क्षणभर सुद्धा थांबवणार नाही. देव, देश, धर्म यासाठीचे माझे जीवन आहे. दुसरीकडे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ही मंगळवारी ट्विट करत दवे यांच्या जीवास धोका असल्याचे म्हटले आहे.

तपास यंत्रणा सावध

भारतीय जनता पक्षाचे माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैंगबर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जगभरात निर्देशने झाली. अखेर पक्षाने त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली. मात्र, त्यानंतर अल्पसंख्याक मूलतत्ववादी संघटनेच्या सदस्यांकडून राजस्थानमधील उदयपूर आणि महाराष्ट्रातील अमरावती येथे गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यापार्श्वभूमीवर अशा घटना अन्य इतरत्र कुठेही घटना घडू नये यासाठी तपास यंत्रणा सावध झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...