आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पीएफएच्या कार्यकर्त्यांची धरपकड:ईडीच्या छाप्याविरोधा सुरू होते आंदोलन; पोलिस म्हणाले - परवानगी घेतली नव्हती

पुणे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय तपासणी यंत्रणा एनआयए आणि अंमलबजावणी संचनालय( ईडी) यांच्या वतीने देशभरात गुरुवारी (22 सप्टेंबर) विविध राज्यात छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एकूण 106 जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आल्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर शुक्रवारी (23 सप्टेंबर) आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, आंदोलनास पोलिसांची परवानगी नसल्याचे कारण देत संघटनेच्या 10 ते 15 जणांची धरपकड करत त्यांना उचलून पोलिस गाडीत नेत आंदोलन गुंडाळण्याचा प्रकार पोलिसांनी केला आहे. याप्रकाराने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. अब्दुल कय्युम शेख (रा. कोंढवा ) आणि रब्बी अहम खान (रा.अशोका म्युज, कोंढवा) अशी पुण्यातून अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पीएफआयच्या पदाधीकाऱ्यांनी पुणे शहरात आमचे कार्यालय नसल्याचे स्पष्ट केले आहे. एनआयए आणि एटीएसने ज्या ठिकाणी कार्यालय म्हणून छापेमारी केली, ते एक छोटे सभागृह आहे. हे सभागृह पीएफआय कार्यक्रमासाठी भाड्याने घेत होते. अटक करण्यात आलेल्या दोघाही सदस्यांसाठी कायदेशीर मदत पुरवणार असल्याचे पीएफआयच्यावतीने सांगण्यात आले.

दहशत निर्माण करण्यासाठी सरकार हे कृत्य करत आहे. विशीष्ट समाजावर ही दहशत पसरवली जात आहे. पीएफआय संघटनेने कोविड काळात आम्ही अनेकांना अन्नधान्य वाटले आहे. हे त्यांना दहशतवादी कृत्य वाटते. आमच्या संघटनेची स्थापना 2007 मध्ये झाली. मात्र 2014 मध्ये धार्मिक विचाराचे सरकार आल्यानंतर आमच्यावर सातत्याने छापे टाकण्यात आले. नुकताच ईडीनेही छापा टाकला होता. राज्यातील संघटनेवर ही दुसरा छापा आहे. रब्बी शेख याला नाशिकमध्ये भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी अटक केली आहे तर अब्दूल कय्युम शेखला अटक का केली हे माहित नाही. आमची संघटना मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करते. केंद्र सरकारनंतर सर्वात जास्त स्कॉलरशीप आमची संघटना देते असे संघटनेच्यावतीने रफीश शेख, इलियास मोमीन, झाहीर शेख, अली इनामदार आदींनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...