आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृषी कायद्यावर स्पष्टीकरण:'काही केले तरी केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही'; भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही : चंद्रकांत पाटील

केंद्र सरकारच्या नवीन कृषी आंदोलनाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 11 वा दिवस आहे. हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. केंद्राने कृषी कायद्यावर शहाणपणाची भूमिका घ्यावी असे शरद पवारांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना 'काही केले तरही हा कायदा रद्द होणार नाही', असे चंद्रकांत पाटील यांनी ठणकावून सांगितले.

कायदा रद्द होणार नाही, फक्त बदल केला जाईल

केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होते तेच आहे. फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली. अशी तरतूद आधी नव्हती असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते पुण्यात आजोयित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘प्रश्न फक्त एमएसपीचा होता. केंद्र सरकार ऑन पेपर एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आपण आंदोलन करणार, भारत बंद करणार याला काही अर्थ नाही. केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही. फक्त कायद्यात बदल केला जाईल.’ असेही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले.

दरम्यान कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातूनही सत्ताधारी महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला. पण असे असले तरी कायदा रद्द होणार नाही असे चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser