आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोयता गँगचे लोण सुप्यापर्यंत:पान दुकानाची तोडफोड करत एकाला केली मारहाण, घटना CCTV त कैद

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यानंतर आता अहमदनगरमध्येही कोयता गँगचे लोण पसरल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील सुपा येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका पान दुकानावर कोयता आणि काठ्या हाती घेतलेल्या एका टोळक्याने दुकानाची तोडफोड केली आणि एकाला मारहाणही केली. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सुपा येथे कोयता घेऊन दहशत निर्माण केल्या प्रकरणी सुपा येथील रहिवासी समीर जब्बार सय्यद यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. समीर जब्बार सय्यद यांनी सुपा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अहमदनगर-पुणे महामार्गावर दरवेश हॉटेल जवळील हिरा मोती पान दुकानाजवळ काही तरुण थांबले होते. त्यानंतर ते तेथे जवळच लघुशंका करु लागले. तेव्हा पान दुकानावरील समीर सय्यद यांनी त्यांना "तुम्ही येथे लघुशंका करु नका तेथे समाज मंदीर आहे" असं म्हणाले. तेव्हा तेथे प्रवासी युवक व स्थानिक युवक याच्यांत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी ते प्रवासी युवक शिवीगाळ करत पुण्याच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर थोड्याच वेळात पुणे जिल्ह्यातील गुन्हेगार कैफ मन्यार हा आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आला.

तेव्हा त्याच्याजवळ कोयता लाकडी दांडके होते. तिथे आल्यानंतर त्यांनी पान दुकानात तोडफोड केली आणि दुकानातील समीर सय्यद व साजित शेख यांना मारलं. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी साजित शेख यास स्थानिकाच्या मदतीने जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

सुपा पोलिसांनी आपला ताफा तात्काळ पुण्याच्या दिशेने वळवला आणि या घटनेतील मुख्य आरोपी कैफ मन्यार याला रांजणगाव गणपती येथे अटक केली. त्यास सुपा पोलिस स्टेशनला हजर केले. समीर सय्यद यांच्या फिर्यादीवरुन सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही बातमीही वाचा...

कोयत्या गँगमधील दोघांच्या मुसक्या आवळल्या:4 कोयते 2 मोबाईल जप्त, दोघे अंधाराचा फायदा घेवून पसार!

बातम्या आणखी आहेत...