आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडित भीमसेन जोशी मला वडिलांसमान:सवाई महोत्सवात अजय चक्रवर्तींचे मत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी संगीताचा मी छोटा सेवक आहे. पं. भीमसेन जोशी मला वडिलांसमान होते. एक काळ होता, जेव्हा ते कोलकत्ता यायचे, तेव्हा मी तंबोरा घेऊन त्यांच्याकडे जात असे, असे सवाई गंधर्व महोत्सवाच्या निमित्ताने पंडित अजय चक्रवर्ती यांनी सांगितले. चक्रवर्ती म्हणाले, अनेक मैफलीत मी लावलेल्या तंबोऱ्यावर त्यांनी गायन केले. कित्येकदा त्यांनी मला तंबोरा लावून दिला. पंडितजी मला नेहमी आशीर्वाद देत असंत. १९८८ मध्ये मला ते हात पकडून इथे घेऊन आले होते. आज माझे शिष्य तुमच्या समोर त्यांची कला सादर करत आहेत, त्यांनाही तुम्ही प्रेम दिले आहे. विशेषतः कौशिकीसाठी मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. संगीत तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी, त्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. संगीत हे फक्त ऐकायचे नसेत, प्रत्येक स्वर कसा दिसतो हे पाहायचे असते.

बातम्या आणखी आहेत...