आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:निवडणूक झाल्यावर सगळे विसरून जावे : अजित पवार, माझा आवाज कुणीच दाबू शकत नाही : फडणवीस

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुन्हा एकत्र आले अजितदादा आणि फडणवीस!

उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील कोविड रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात पुन्हा एकत्र आले. त्यांच्या टोलेबाजीने पुन्हा धमाल उडवली. अजित पवार म्हणाले, ‘मी आणि फडणवीस’ एकत्र येणार म्हटले की लगेच ब्रेक्रिंग न्यूज हाेते. मात्र, त्यांना माहीत नव्हते की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादाही कार्यक्रमाला येणार आहेत. राजकीय भूमिका आणि मते वेगवेगळी असतात, परंतू निवडणूक झाल्यावर सगळे विसरून जावे.’

आवाज... आवाज!
बाणेरच्या काेविड सेंटर कार्यक्रमात भाषण करताना फडणवीस यांचा आवाजच येत नसल्याने लोकांनी ‘आवाज... आवाज’ असा पुकारा केला. त्यावर फडणवीस यांनी ‘माझा आवाज कुणी दाबू शकत नाही,’ असे म्हणताच बाजूला बसलेल्या अजित पवार यांना हसू आवरले नाही.