आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा परिणाम: पुणे आणि पिंपरी चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन, अजित पवारांचे आदेश

पुणे10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे आणि पिंपरी चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. आता सोमवारी मध्यरात्रीपासून पुढचे 15 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे. 

अनलॉकच्या दरम्यान कंटेनमेंट झोन वगळता पुण्यातील काही भागात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला होता. मात्र, करोनाचा धोका हा दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांची संख्याही जास्त आहे. अनेक लोक हे मास्क न वापरता फिरत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. हा संसर्ग टाळता यावा यासाठी पुण्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलैपासून पुढचे 15 दिवस लॉकडाउन असणार आहे.

पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीत मर्यादित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील, सोशल डिस्टन्स पाळण्यावर कटाक्ष देण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...