आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटलबिहारी वाजपेयींची उंची मोठी:नैतिकतेच्या मुद्दयावर शिंदे-फडणवीस राजीनामा देतील असे स्वप्न देखील पाहू नका : अजित पवार

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अटलबिहारी वाजपेयी आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांची उंची यात जमीन-आस्मानचा फरक आहे. नैतिकतेच्या मुद्दयावर शिंदे-फडणवीस सरकार राजीनामा देतील असा विचार कुणी मनात सुद्धा आणू नका. ते प्रत्यक्षात काय स्वप्नात पण राजीनामा देणार नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजप सरकारला लगावला आहे.

राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष ज्याकडे लागले होते त्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल गुरुवारी समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील. या निकालानंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

पक्षांतर बंदी कायद्याला अर्थ आहे का?

अजित पवार म्हणाले, जूनमध्ये ही घटना घडली. राजकीय उलथापालथी झाल्या. मी आधीच शक्यता व्यक्त केली होती. तसेच झाले विधानसभा अध्यक्षांकडे निर्णय सोपवण्यात आला आहे. पक्षांतर बंदी कायद्याला महत्त्व राहणार आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. देश पातळीवर अशा घटना घटना घडल्या तर जनतेचा अपमान व्हायला नको.

राज्यपाल पद महत्त्वाचे

अजित पवार म्हणाले, मी आधीच सांगितले होते की सरकारला या निर्णयाने फरक पडणार नव्हता. त्यांच्याकडे बहुमत होते. राज्यापालांची कालच्या प्रतिक्रियेची क्लिप मी पाहिली. राज्यपाल पद हे महत्त्वाचे पद आहे. त्या पदावर बसल्यावर पक्षाची पार्श्वभूमी न पाहता निर्णय घ्यायला हवा.

आमची चूक झाली

अजित पवार म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा द्यायला नको होता. मुख्यमंत्र्यांना सांगितले नाही. विधानसभा अध्यक्षांची निवडणुक व्हायला हवी होती. तातडीने धसास न्यायला हवा होता. पद रिकामे होते, जर आम्हीच ते पद भरले असते तर आज आमच्या विधानसभा अध्यक्षांनी 16 जणांना अपात्र केले असते.

संबंधित वृत्त

पोपट मेलेला आहे: राजीनामा द्या अन् पुन्हा निवडणुकांना सामोरे जा, जनतेचा कौल स्विकारा; उद्धव ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांना आव्हान

नैतिकतेला धरुन मी राजीनामा दिला. आता बेकायदेशीर सरकारने आपला राजीनामा द्यावा. आणि पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जाऊयात. जनता सर्वोच्च आहे. त्यांचा कौल स्विकारुया, असे म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांना निवडणुकांना सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर