आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबा-नातू वाद:अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, 'मला कुणाशीही काही बोलायचं नाही' म्हणत पार्थ पवारांविषयी बोलणे टाळले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांची अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या तपासप्रकरणी पक्षविरोधी भूमिका आणि त्यापाठोपाठ आजोबा शरद पवारांनी त्यांची जाहीर कानटोचणी करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी पक्षात बराच गोंधळ सुरू असल्याचे दिसले. अनेक बैठकाही सुरू आहेत. पवार कुटुंबीयांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. अशात आता अजित पवारांनी पार्थ पवारांविषयी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

पार्थ पवारांचे कान टोचल्यानंतर बऱ्याच घडामोडी राष्ट्रवादीमध्ये घडत आहेत. या सर्वांवर अजित पवार यांची भूमिका काय याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांना या सर्व प्रकरणाविषयी प्रश्न विचारल्यावर पार्थ पवारविषयी बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे

काय म्हणाले अजित पवार?
बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांना पत्रकारांनी पार्थ पवारांविषयी प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी मला कुणाशीही काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचंय असं ते म्हणाले. तसेच मी सकाळी सकाळी या अधिकाऱ्यांना इकडे आणले असल्याचे म्हणत त्यांनी या प्रकरणावर बोलणं टाळलं आहे.

पार्थ पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष सर्वांच लक्ष लागले आहे. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार हे आपल्या बारामती दौऱ्यात विविध विकासकामांची आज पाहणी करणार आहेत. यासोबतच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आढावा बैठक घेतील आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळ देणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...