आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे आक्षेपार्ह वक्तव्य विधानसभेत केले होते. याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या नेतृत्वात डेक्कन परिसरातील खंडोजी बाबा चौक छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पवार आणि राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.मुळीक म्हणाले, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे यांचा अपमान केला आहे. संभाजी राजे यांनी आयुष्भर धर्म जपला त्यांचा औरंगजेब याने अमानुष छळ केला. अनेक जणांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले परंतु राजांनी धर्म सोडला नाही.
औरंगजेब याच्याकडून अजित पवार आणि त्यांचा पक्ष प्रेरणा घेत आहे. त्यामुळे त्यांना इतिहासात नाक खुपसण्याची गरज नाही. राजे यांनी स्वतःचे धर्मासाठी बलिदान केल्याने त्यांची प्रेरणा देशभरातील लाखो लोक घेत आहे.औरंगजेब याने अनेक हिंदु मंदिरे जाणीवपूर्वक पाडली. लोकांवर अत्याचार केले. औरंगजेब याच्या विरोधात राजे आयुष्याच्या शेवट पर्यंत लढत राहिले, पण मताच्या राजकारणासाठी त्यांच्या नावाचा दुरुपयोग पवार करत आहे.
पवार यांनी संभाजी राजे यांच्याबाबत केलेल्या विधानसाठी राज्यातील जनतेची माफी मागावी. त्यांचे वक्तव्य चुकीचे आणि निषेधार्ह आहे, त्यांनी आक्षेपार्ह बोलून इतिहास बदलणार नाही हे लक्ष्यात घ्यावे. यावेळी भाजप पदाधिकारी धनंजय जाधव, आदित्य माळवे,राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, निवेदिता एकबोटे, प्रतीक देसरडा, दीपक पवार, ओंकार केदारी, महेश पवळे, अपूर्व खाडे,सुनील मिश्रा, भैरवी वाघ, प्रशांत सुर्वे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.