आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे अजित पवारांनी मारली दांडी:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले- अजित पवारांना कोरोना झाल्याची शक्यता, त्यामुळेच दिवाळीच्या कार्यक्रमाला गैरहजर

बारामतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवार आणि कुटुंबियांनी दिवाळीनिमित्त गोविंदबाग येथे डिनर पार्टी आयोजित केली. पवार कुटुंबियांच्या गुरुवारी झालेल्या फॅमिली डिनरचे फोटो सर्वत्र चर्चेत आले. परंतु, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार दिसले नाहीत. त्याचेच कारण शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी याबाबत खुलासा केला. तसेच अजित पवार यांना कोरोना झाला असावा अशी शक्यता पवारांनी व्यक्त केली आहे.

शरद पवार यांच्या कुटुंबियांची दिवाळी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. नेहमीप्रमाणेच या वर्षी सुद्धा पवार कुटुंबीय बारामती येथे एकत्रित जमले आहेत. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी सर्वांनी गोविंदबागेत डिनर केले. यानंतर कौटुंबिक फोटो सेशन सुद्धा केले. या फोटोंमध्ये प्रतिभा पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील इतर मंडळी दिसून आली. परंतु, शरद पवारांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कुठेही दिसले नाहीत.

शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे, उपमुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे अजित पवारांनी सुद्धा कोरोनाची टेस्ट करून घेतली. त्यांचा रिपोर्ट अजून आलेला नाही. त्यामुळेच अजित पवारांनी कार्यक्रमात येणे टाळले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्र्यांचे 2 चालक आणि 3 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अशात अजित पवारांनी दिवाळी पाडव्यानिमित्त जाहीर कार्यक्रमात येणे, लोकांना भेटणे यातून कोरोनाचा फैलाव होण्याची भीती आहे. असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले आहेत. दिवाळी निमित्त दरवर्षी बारामतीला येऊन कार्यकर्ते शरद पवारांची भेट घेत असतात. तो शुक्रवारी आयोजित करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...