आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Ajit Pawar Critizsize To Cabinet Expantion Shinde Govt | Cabinet Expansion Take Place; No Matter How Much Gossip, Nothing Will Happen From Shinde Fadnavis

अजित दादांचा संताप:कितीही गप्पा मारल्या तरी शिंदे-फडणवीसांकडून काहीच होणार नाही; मंत्रिमंडळ विस्तारावर आगपाखड

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लवकरच... लवकरच... लवकरच... हेच शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या तोंडातून निघतात. होईल... होईल... होईल... असे ते सांगत असतात. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, असे सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना विचारला आहे, ते आज पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक प्रश्न आहेत. अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे, वेगवेगळी संकट येतात, अनेक घटना घडतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले आहेत, पालकांसमोर अनेक अडचणी आहेत, विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत, निर्णय कोण घेणार, असा सवाल देखील अजित पवारांनी केला आहे.

आत्मचिंतन करण्याची गरज

आम्ही दोघे आहोत... आम्ही दोघे आहोत... असे शिंदे-फडणवीस म्हणतात पण हे दोघे महाराष्ट्राला पुरू शकतात का? याचे तरी आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करावे. वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने याचा फटका राज्याला बसत आहे, तरी देखील त्यांना त्याचा भान राहिलेला नाही, अशी टीकाही पवारांनी यावेळी शिंदे-फडणवीसांवर केली.

...तरच मंत्रिमंडळ विस्तार

पुढे ते म्हणाले की, आज शिंदे-फडणवीस यांच्या हातात काहीच नाही. दिल्लीतून सिग्नल मिळाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तोपर्यंत कितीही गप्पा मारल्या तरी त्यांच्या हातातून काहीच घडणार नाही. पुर्वीच्या काळात काँग्रेस आणि शिवसेना असताना मंत्रिमंडळाचे निर्णय महाराष्ट्रात व्हायचे, दिल्लीत निर्णय होत नव्हते, अशी खोचक टीकाही अजित पवारांनी यावेळी भाजपवर केली.

शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर

राज्यात सत्तांतर होऊन महिन्यांपेक्षा अधिकचा कालवधी उलटला असली तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सध्या राज्याचा गाडा हकलताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील सध्या दिल्लीतच असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आजची दिल्लीवारी महत्वाची मानली जाते, असे म्हटले जात आहे.

मंत्रिमंडळ लांबणीवर?

दरम्यान, राजकीय वर्तुळात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 7 तारखेच्या आधी होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आज सहा तारीख असून अद्याप पर्यंत यासंबंधीच्या कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाही. त्याचच सोमवारी म्हणजेच 8 ऑगस्टला शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची या प्रकरणावर देखील सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. कारण, सोमवारच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिल्ली दौरा कशासाठी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 11 वाजता दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक बोलावली आहे. आज दुपारी साडेचार वाजता ही बैठक होईल. यासाठी फडणवीसही दिल्लीला जाणार असले, तरी वेगळ्या विमानाने दिल्ली गाठण्याची शक्यता आहे.

नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी

रविवारी सकाळी 10 वाजता नीती आयोगाच्या बैठकीलाही मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. दोन शासकीय बैठकांच्या निमित्ताने मुख्यमंत्री दिल्लीत जाणार असले, तरी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणे साहजिक मानले जाते. त्यानंतर उद्या दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईत परत येतील.

बातम्या आणखी आहेत...