आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक दे इंडिया:पिंपरी - चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उदघाटन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी - चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झाले. पुणे आणि पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या मान्यतेने व महाराष्ट्र हॉकी औंध, पुणे यांच्यावतीने नेहरुनगर येथे मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम सुरू करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता झालेल्या या कार्यक्रमात पवार यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली.

क्रीडा राजधानीकडे वाटचाल

भविष्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धाच्या अनुषंगाने व शहरास देशाची क्रीडा राजधानी म्हणून ओळख निर्माण व्हावी व पिंपरी चिंचवड शहरामध्ये हॉकी खेळाचा प्रचार - प्रसार आणि विकास करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या व हॉकी महाराष्ट्र औंध पुणे यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे खेळाडू निर्माण करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...