आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे पहिल्यांदा आमदार कसे झाले, याचा किस्सा आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितला. यावेळी त्यांनी जगताप यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचे स्वांत्वनही केले.
लक्ष्मण जगताप यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा वरिष्ठांचा दबाब होता. हे सारे मॅनेज करून त्यांना उभे केले, याचा किस्सा अजित पवार यांनी यावेळी सांगितला.
लक्ष्मण जगताप हे तीन वेळेस आमदार राहिले. ते दीर्घ काळापासून कर्करोगामुळे आजारी होती. त्यांचे 3 जानेवारी रोजी निधन झाले. जगताप यांच्या कुटुंबाची भेट घेत अजित पवार यांनी त्यांची सांत्वन केले. अजित पवार यांनी लक्ष्मण जगताप यांचे मोठे बंधू विजय जगताप, लहान बंधऊन शंकर जगताप, जगताप कुटुंबातील सर्व मुले आणि मुली या साऱ्यांना बोलावून त्यांची विचारपूस केली. कोण, काय करते, याची माहिती घेतली. तसेच सगळ्यांना खंबीर राहण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अजित पवार म्हणाले की,2004 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी विधानपरिषदेचे निवडणूक लढवली. जगताप यांना मी निवडणूक अपक्ष उभे राहायला सांगितले होते. फक्त आपण सांगेपर्यंत मोबाइल स्वीच ऑन करू नको, हा निरोप दिला होता. कारण या जागेवर समोरून काँग्रेसचा उमेदवार उभा होता. मात्र, यानंतरही मी जगताप यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ते अपक्ष म्हणून निवडून आले. जगताप यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतरही त्यांचे अजित पवारांसोबतचे संबंध जिव्हाळ्याचे होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.