आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातात्या कधी येताय. वाट पाहतोय, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांना खुली ऑफर दिलीय. त्यामुळे पुण्यात जोरदार चर्चा रंगलीय.
वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सनेबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय. त्यात एका कार्यक्रमात अजित पवार आणि वसंत मोर यांची भेट झाली. तेव्हा पवार यांनी त्यांच्या स्टाइलमध्ये मोरे यांना राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिली.
मोरे पुण्यातील चेहेरा
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि वसंत मोरे काल पुण्यात एका लग्न समारंभात भेटले. यावेळी पवार यांनी त्यांच्या शैलीत मोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. 'तात्या कधी येता... वाट पाहतोय,' असे पवार मोरे यांना म्हणाले. अजित पवारांच्या वक्तव्याला वसंत मोरे यांनीही दुजोरा दिला आहे. वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचा चेहेरा आहेत. मात्र, काही दिवसांपासून ते नाराज आहेत. राज ठाकरे यांच्या भोग्याच्या मुद्यावरून मोरे हे नाराज होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर देखील नाराजी व्यक्त केली होती.
जाणूनबूजुन डावलले जाते
पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे हे संपूर्ण राज्यात दौरे करत आहेत. कार्यकर्त्यांना पक्ष मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करत असताना पुण्यात मात्र, मनसेला खिंडार पडले आहे. वसंत मोरे यांचे जवळचे कार्यकर्ते असणारे, नीलेश माझिरे यांची दीड महिन्यांपूर्वी मनसेतून हकालपट्टी करण्यात आली होती. आता त्यांनी पक्षाला राम राम केला आहे. तब्बल 400 कार्यकर्त्यांना घेऊन ते बाहेर पडल्याने पक्षाला खिंडार पडले आहे. येत्या काही दिवसांत महानगर पालिकेच्या निवडणुका आहेत. मात्र, त्या पूर्वीच पक्षाला खिंडार पडल्याने मनसेला हा मोठा धक्का समजला जात आहे. तर, मला पक्षात जाणूनबूजुन डावलले जात असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी सोमवारी केला आहे.
माझिरेंची काढली समजूत
माझिरे यांनी यापूर्वीही मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. जून महिन्यात माझिरे हे मनसेतून बाहेर पडले होते. त्यानंतर ते पुन्हा पक्षात आले होते. आता माथाडी जिल्हा अध्यक्ष पदावरू बाजूला केल्यानंतर पुन्हा एकदा माझिरे हे मनसेतून बाहेर पडले होते. मात्र, राज ठाकरे यांनी माझिरे यांची समजूत काढली होती. त्यानंतर नीलेश माझिरे यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला होता. आता ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे आहेत आरोप
मोरे यांना पक्षातील पदाधिकारी विश्वासात घेत नाहीत. बैठकांना बोलावत नाहीत, मेळाव्याला, सभांना गेले तरी, भाषण करण्याची संधी देत नाहीत. असे आरोप केले होते. याचा विरोध त्यांनी केला होता. या बद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, दीड महिन्यापूर्वी त्यांची हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईमुळे माझिरे हे नाराज होते. यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.