आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिंचवड आणि कसबा निवडणूक बिनविरोध होण्याचे काही कारण नाही. त्यांनी पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूरची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. एक मुंबईच्या बाबतीत त्यांनी बिनविरोध करण्याबाबत निर्णय घेतला म्हणजे बाकीच्या निवडणुका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढावे. लोकशाही आहे त्यामुळे जनतेला ज्यांना मतदान द्यायचे त्यांना देतील अशी स्पष्ट भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला आज दिला. ते पुण्यात आज माध्यमांशी बोलत होते.
CM, भाजपकडून प्रयत्न
पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील बिनविरोध होणार नाहीत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडून बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरी मुंबई वगळता कुठलीही निवडणूक बिनविरोध झालेली नाही त्यामुळे या दोन्ही जागेवर निवडणूक होणारच.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर भाष्य
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर देखील अजित पवार यांनी भाष्य केले. 'राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबच चालल्या आहेत. निवडणुका आणखी लांबू शकतात. मात्र निवडणुका कधी घ्यायचा हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय?:प्रकाश आंबेडकर म्हणाले - शिवसेनेच्या निर्णयानंतर आपली भूमिका करणार स्पष्ट
पुणे जि्ल्ह्यातील दोन मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करत आहे. मात्र वंचित बहूजन आघाडी जर शिवसेनेने उमेदवार दिला तर त्यांना पाठिंबा देईल् त्यांच्यासह आमची युती आहे. मात्र, जर शिवसेनेने दोन्ही जागा लढवाव्या कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेनंतर आम्ही भूमिका स्पष्ट करणार आहोत असे वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. सविस्तर येथे वाचा
आव्हाडांचे विधान वैयक्तिक
अजित पवार म्हणाले, 'जितेंद्र आव्हाड यांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक विधान आहे. पक्षातील नेत्यांचे वैयक्तिक मत असू शकतात. पक्षाच्या प्रवक्त्याने एखादं मत व्यक्त केले तर ते पक्षाचे मत असू शकते. मात्र, आव्हाड पक्षाचे प्रवक्ते नाहीत ते नेमके काय बोलले हे मला माहित नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.