आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यातील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम, उदघाटन कार्यक्रमांना चंद्रकांत पाटील यांना बोलावले जात नाही म्हणून त्यांनी कार्यक्रमापूर्वी परवानगी घेण्याचे आदेश दिले आहेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार पुणे जिल्हयात शासकीय विकासकामाचे भूमिपूजन कार्यक्रम, उदघाटन हाेण्यापूर्वी पालकमंत्री यांची परवानगी घेण्यात यावी असा आदेश काढण्यात आला आहे. मी आज विराेधी पक्षनेते आहे. मला एखादा कार्यक्रम घ्याचा असेल आणि ताे माझा संमतीने असेल. त्यास राज्यसरकारने निधी दिलेला असेल तर ताे काय पालकमंत्र्याचा निधी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. परंतु काय झाले सध्याचे पालकमंत्र्यांना कार्यक्रमासच काेणी बाेलवत नाही त्यामुळे त्यांना अशाप्रकारचे ऑर्डर काढावी लागली असा टाेला विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील एका कार्यक्रमात शनिवारी लगावला आहे.
पवार म्हणाले, अरे पालकमंत्र्यात धमक पाहिजे आणि अधिकाऱ्याने पण विचार केला पाहिजे की, पालकमंत्र्यास कार्यक्रमास बाेलवले नाहीतर आपले काही खरे नाही. अशाप्रकारे आतापर्यंत कधीच आदेश काढले गेले नाही.जिल्हयातील विकासाचे कामाकरिता सर्वच गाेष्टी पालकमंत्र्यांना काय विचारायचे आहे. फारतर एखादा माेठा कार्यक्रम तर त्यांचे हस्ते नारळ फाेडला पाहिजे टिकाव मारला पाहिजे. फीत कापली पाहिजे हे आपण समजू शकताे परंतु जिल्हयातील सर्व विभागांना पत्र पाठविण्यात आले की, काेणते शासकीय कार्यक्रम घेण्यापूर्वी पालकमंत्री यांचे कार्यालयातून परवानगी घेण्यात यावी. त्यानंतरच कार्यक्रमाचे नियाेजन करण्यात यावे. अन्य काेणी परवानगी शिवाय शासकीय कार्यक्रमाचे आयाेजन केले असल्यास त्याबाबत कारवाईचे संकेत दिले ही बाब अयाेग्य आहे.
मी कधी काेणावर चीडत नाही
पवार म्हणाले, मी फार तापट आहे. अनेकजणांना वाटते हा इतका कडक तरी बारामतीकर यास कसा निवडून देतात हा प्रश्न बारामतीकर साेडून इतरांना पडताे. मी काेणावर चीडत नाही परंतु एखादे कामात हलगर्जीपणा केला, कामाचा दर्जा दिला नाही तर आेरडताे. कारण यासाठीचा निधी हा समाजाचा कररुपाने आलेला असताे. शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयाेगानुसार पगार दिलेला जाताे. एक लाख 44 हजार काेटी रुपये राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना पगार व पेन्शन दिली जाते. त्यामुळे त्यांनी त्यांचे काम चांगल्याप्रकारे करावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.