आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बातम्या येतात कशा?:महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात आपल्याला अजून क्लिन चीट नाही; अजित पवारांकडून चर्चांना पूर्णविराम

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी ईडी कडून चौकशी चालू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे क्लिनचिट मिळालेली नाही, असे सांगत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या आरोपपत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव नाही. त्यामुळे ईडीने अजित पवार व सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट दिली का?, अशी चर्चा रंगली आहे. मात्र आता यावर खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ईडी कडून चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे क्लिनचिट मिळालेली नाही. ती बातमी कशाला अनुसरून दिली मला काही कळायला मार्ग नाही. पण मी आज स्पष्टपणे सांगू इच्छितो की अशा प्रकारची क्लीन चीट मिळालेली नाही.

मविआ आल्यानंतर कारवाई थांबली

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी जवळपास बंद झाली. जवळपास 25 हजार कोटींचा हा घोटाळा आहे. मात्र, 9-10 महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर चौकशीला पुन्हा वेग आला आहे. याप्रकरणी ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याची 65.75 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त केली होती.

19 एप्रिलला विशेष सुनावणी

ईडीने अजित पवारांशी संबंधित या कंपनीला आरोपी बनवले आहे. कंपनीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले आहे. त्यामुळे अजित पवार यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आतापर्यंत ईडीने या प्रकरणी अजित पवार यांची एकदाही चौकशी केली नाही.

19 एप्रिल रोजी ईडीच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीत नेमके काय होते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अजून तपास सुरू आहे. त्यामुळे गरज पडल्यास ईडी पुन्हा पुरवणी आरोपपत्र दाखल करू शकणार आहे. त्यामुळे पुढील आरोपपत्रात अजित पवार यांचे नाव येणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

संबंधित वृत्त

चर्चा तर होणारच:ईडीकडून विरोधी पक्षनेते अजित पवारांना दिलासा

राज्यासह देशभरात ईडीकडून भाजपविरोधी नेत्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. महाराष्ट्रात मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांना ईडीकडून दिलासा मिळाल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे. ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील आरोप पत्रातून अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव वगळले आहे. अजित पवार व शरद पवार यांची आताची भाजप अनुकूल भूमिका पाहता महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना क्लीन चीट मिळणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी नेमका काय आहे हा घोटाळा हे जाणून घेऊयात... वाचा सविस्तर