आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही एक मोठी चूक होती. जर त्याचवेळी निवडणूक घेऊन पद भरले असते, तर आज विधानसभा अध्यक्ष महाविकास आघाडीचा असता आणि 16 आमदार अपात्र झाले असते. ही महाविकास आघाडीची चूक होती, असे म्हणत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी 'मविआ'ची चूक मान्य केली आहे.
राज्यभरात प्रचंड उत्सुकता असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत परखड शब्दांमध्ये राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे आढले आहेत. तसेच अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील.
मुख्यमंत्र्यांनाही माहित नव्हते
अजित पवारांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी नेमकी कुठे चुकली याबाबत सविस्तरपणे सांगितले. अजित पवार म्हणाले, विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा द्यायला नको होता. याबाबत त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांना न विचारता दिला गेला. तो द्यायला नको होता.
पद रिकामे राहायला नको होते
अजित पवार पुढे म्हणाले, राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणुक तातडीने घ्यायला हवी होती. पद रिकामे राहिले. आणि या सगळ्या घटना घडल्या. हा प्रश्न तातडीने धसास न्यायला हवा होता. यासाठी मी कोणालाही दोषी धरत नाही. मात्र अनेक दिवस उपाध्यक्षच अध्यक्षांचे काम पाहिले असते. पद रिकामे होते, जर आम्हीच ते पद भरले असते तर आज आमच्या विधानसभा अध्यक्षांनी 16 जणांना अपात्र केले असते.
संबंधित वृत्त
अटलबिहारी वाजपेयींची उंची मोठी:नैतिकतेच्या मुद्दयावर शिंदे-फडणवीस राजीनामा देतील असे स्वप्न देखील पाहू नका : अजित पवार
अटलबिहारी वाजपेयी आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांची उंची यात जमीन-आस्मानचा फरक आहे. नैतिकतेच्या मुद्दयावर शिंदे-फडणवीस सरकार राजीनामा देतील असा विचार कुणी मनात सुद्धा आणू नका. ते प्रत्यक्षात काय स्वप्नात पण राजीनामा देणार नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजप सरकारला लगावला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.