आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पलटवार:शरद पवारांवर काँग्रेसची टीका, अजित पवार संतापले; कोणी आम्हाला काही म्हटले तरी आमच्या अंगाला भोकं पडत नाही

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणी आम्हाला काही म्हटले तरी आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत, आम्ही कोणच्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधिल नाहीत. आम्हाला तेवढेच काम नाही. जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणे आमचे काम आहे. असे तर रोज 'हवसे-गवसे-नवसे' टीका करतील, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार यांच्या जेपीसी भूमिकेवरुन टीका केली आहे. अलका लांबा म्हणाल्या, घाबरलेले, स्वार्थी लोक आज आपल्या वैयक्तिक हितासाठी सत्तेचे गुणगान गात आहे. देशातल्या लोकांची लढाई राहुल गांधी एकटेच लढत आहेत. भांडवलदार चोरांपासून तसेच चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराशीही ते एकटेच लढत आहेत. काँग्रेसच्या या टीकेचा अजित पवारांनी समाचार घेतला.

अदानींनी रोजगार दिला

अजित पवार यांचा देखील गौतम अदानींसोबत एक फोटो व्हायरल होत आहे. यावर अजित पवार म्हणाले, अदानींसोबतचाच फोटो आहे ना? कोणत्या अंडरवर्ल्ड डॉन सोबत तर फोटो नाही काढलाना? असा सवाल पवारांनी उपस्थित केला. टाटा-बिर्ला यांनी कित्येक लोकांना रोजगार दिला. तसेच अदानींनी केले.

शरद पवार आमचे सर्वोच्च नेते

अजित पवार म्हणाले, समिती अदानी यांच्याबाबत चौकशी करेल. लगेचच कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही. मीही काल शरद पवारांची मुलाखत बघितली. शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने भूमिका मांडल्यानंतर आम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही. त्यांची जी भूमिका आहे, तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे.

मविआत बिघाडी?

अदानी घोटाळ्याची जेपीसीद्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. नाना पटोले, अशोक चव्हाण यांनी जेपीसीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आपण जेपीसी चौकशीवर ठाम असल्याचे म्हटले आहे.

भाजपचे प्रत्युत्तर

अलका लांबा यांच्या या टीकेला आता भाजपने उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारण होत राहील. पण काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांच्या 35 वर्षांच्या दीर्घकाळ सहयोगी आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आणि महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांच्याविषयी केलेले हे ट्विट भयावह आहे. राहुल गांधी भारताची राजकीय संस्कृती बिघडवत आहेत.