आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:भाजप प्रवेशावरून अंजली दमानियांना अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले - एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल मी काय बोलणार?

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल मी छोटा कार्यकर्ता काय बोलणार? असे म्हणत अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्वीटवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. यावरुन पवारांनी खोचक टोला लगावला.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत अजित पवार म्हणाले, 1 मेला महाराष्ट्र दिनाला जी सभा होणार आहे. त्यावर त्यांची चर्चा झाली असेल. कारण नसताना मविआमध्ये बिघाडी करण्याचा प्रयत्न करु नये, मार्ग निघू शकतो. नेत्यांच्या प्रतिक्रियांमुळे महाराष्ट्रात काम करणारा कार्यकर्ता संभ्रमात पडतो. काँग्रेसच्या अंतर्गत प्रश्नावर बोलण्याचा मात्र मला अधिकार नाही. त्यांच्या पक्षात नाक खुपसण्याचा प्रयत्न करु नका, असेही पवार म्हणाले.

लातूरमध्ये मतभेद

अजित पवार म्हणाले, लातूरमध्ये काँग्रेस निर्णय घेऊ देत नाही यासाठी तेथील कार्यकर्ते, पदाधिकारी भेटायला आले होते. याबाबत आपण जयंत पाटलांशी बोललो आहे. याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. याबाबतही अजित पवारांनी माहिती दिली.

माझ्यामुळे धोका कसा असेल?

अजित पवार म्हणाले, कोणाच्याही जीवाला धोका असेल त्याला संरक्षण मिळायला हवे. ज्याने तक्रार केलीय त्याला संरक्षण द्यावे. तुम्हाला वाटते का माझ्यामुळे कुणाच्या जीवाला धोका आहे? मी कायदा आणि संविधान पाळणारा माणूस आहे. माझ्यामुळे धोका कसा असेल? कुणाच्याही मुळे कुणाला धोका असेल तर संरक्षण द्यावे. माझ्यामुळे कोणाला राजकीय धोका असू शकतो मात्र फिजीकल धोका नाही, असे म्हणत टोला लगावला.

क्लीन चीट मिळालेली नाही

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या आरोपपत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव नाही. त्यामुळे ईडीने अजित पवार व सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट दिली का?, अशी चर्चा रंगली आहे.

याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ईडी कडून चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे क्लिनचिट मिळालेली नाही. ती बातमी कशाला अनुसरून दिली मला काही कळायला मार्ग नाही. पण मी आज स्पष्टपणे सांगू इच्छितो की अशा प्रकारची क्लीन चीट मिळालेली नाही.

शिंदे गटाचे 15 आमदार बाद होणार

अंजली दमानिया यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची किती दुर्दशा होतेय तेही लवकरच बघू.

संबंधित वृत्त

अनिश्चित राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली असतानाच अंजली दमानियांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली आहे. वाचा सविस्तर