आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरम इंस्टिट्यूट आग दुर्घटना:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले सीरम इंस्टिट्यूटमधील आगीचे कारण

पुणे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'कोरोना लसीकरणाची जबाबदारी केंद्रानेच उचलावी'

पुण्यातील मांजरी परिसरात असलेल्या सीरम इंस्टि्टयूट ऑफ इंडिया (SII)मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेचा तपास पूर्ण झाला आहे. ही आग शॉर्ट सक्रिटमुळे लागल्याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवारांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "सीरमच्या ज्या इमारतीमध्ये आग लागली होती, तिथे काम सुरू होते. यावेळी शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागली आहे."

21 जानेवारीला कोरोना लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटमधील एका इमारतीला मोठी आग लागली होती. या आगीत पाच कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौकशीचे आदेश दिले होते. SII च्या पुण्यातील प्लँटमध्ये ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची कोव्हीशील्ड व्हॅक्सीन तयार केली जाते. परंतु, या दुर्घटनेत कोरोना व्हॅक्सीनचे नुकसान झाले नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले होते.

कोरोना लसीकरणाची जबाबदारी केंद्रानेच उचलावी

केंद्र सरकार वारंवार कोरोना लसीकरणाबाबत भूमिका बदलत असून आधी पोलिस, आरोग्य कर्मचारी, संरक्षण क्षेत्रातील लोकांना लस देणार, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. पुन्हा ३० कोटी लोकांना लसीकरण करणार, पुन्हा ३ कोटी लोकांना, आता ६० वर्षांवरील लोकांना लसीकरण करणार, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. ६० वर्षांखालील लोकांना कोरोना गंभीर स्वरूपात झाल्यावर लस टोचणार, अशी घोषणा केली आहे. मात्र, देशाची सामूहिक जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. त्यांनी लसीकरणाची जबाबदारी उचलावी, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

राज्यांनी लसीकरणाचा पन्नास टक्के खर्च उचलावा, या केंद्र सरकारच्या भूमिकेला उत्तर दिले. कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. तरी राज्यातील जिल्हा वार्षिक नियोजनासाठी कोणतीही कपात केली नसल्याचे सांगितले. डिसेंबरअखेरपर्यंत कोरानासाठी शिल्लक निधी १७७ कोटींहून अधिकचा निधी मार्चअखेरपर्यंत आरोग्य सेवांवर खर्च करण्यास सांगितला आहे. त्यामध्ये रुग्णालयाच्या सोयी सुविधांवर खर्च व्हायला हवा, अशा सूचना केल्याचे पवार म्हणाले.