आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Ajit Pawar Saw The Garbage As Soon As He Got Down From The Car, First Picked It Up And Kept It In His Pocket And Then Inaugurated The Covid Center; News And Live Updates

उपमुख्यमंत्र्यांची अशीही स्वच्छता:गाडीतून उतरताच अजित पवारांना दिसला कचरा; आधी खिशात ठेवले आणि नंतर कोविड सेंटरचे उद्घाटन केले

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बारामतीकरांना या सेंटरमुळे होणार फायदा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्वच्छतेमुळे नेहमीच चर्चेत असतात. परंतु, स्वच्छतेच्या बाबतीत पुण्यातून एक ताजे प्रकरण समोर येत आहे. शुक्रवारी अमेरिकन इंडिया फाउंडेशन आणि मास्टरकार्डद्वारे उभारलेल्या पोर्टेबल कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री तेथे दाखल झाले होते. यावेळी जिथे अजित पवारांची गाडी येऊन थांबली, तिथे काही कचरा पडलेला होता. गाडीतून उतरताच अजित पवारांचे लक्ष त्या कचऱ्याकडे गेले. दरम्यान, त्यांनी तिथे पडलेला तो कचरा उचलून घेत आपल्या शिखात ठेवला आणि उदघाटन करण्यासाठी निघून गेले.

आधी दुसरी डोस दिली जाणार
कार्यक्रमादरम्यान अजित पवार म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पहिली डोस घेतलेल्यांनांच दुसरा डोस देण्यात येणार आहे. कारण पहिल्या डोसचा प्रभाव जास्त दिवस राहत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस संपल्यानंतर पहिली लस दिली जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

बारामतीकरांना या सेंटरमुळे होणार फायदा
अजित पवार पुढे म्हणाले की, शरद पवारांना नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याचा अनुभव आहे. यामुळे पवार साहेबांकडे आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. बारामतीत प्रत्येकाचे आरोग्य चांगले असावे. शिक्षण चांगले असावे. यासाठी बारामतीमध्ये अनेक संस्था तयार झाल्या. आता बारामती हे शिक्षणाचे केंद्र बनले आहे. बारामतीत वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाले असून नंतर आयुर्वेद महाविद्यालयालाही मान्यता मिळाली असल्याचे म्हणाले. बारामतीतील पोर्टेबल कोविड केअर सेंटरचा लाभ जवळपासच्या तालुक्यांनाही होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...