आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाला निरोप:अजित पवार यांनी पत्नीसह घेतले दगडूशेठचे दर्शन, चंद्रकांत पाटील नाना पाटेकरांच्या घरी

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपती, मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मित्र मंडळ, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मित्र मंडळ, मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ व काही सार्वजनिक मंडळाचे दर्शन घेतले व आरती केली.

अजित पवार यांनी पत्नीसह या मंडळातील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार यांनी पत्नीसह या मंडळातील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील नानांच्या घरी

दुसरीकडे, प्रसिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या घरगुती गणपतीचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी नानांसोबतच्या चर्चांमध्ये अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कालच अजित पवार यांनीही नाना पाटेकरांच्या घरी जात गणरायाचे दर्शन घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...