आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे खमक्या तर कधी तडकफडक तर कधी हळवे व्यक्तिमत्व. त्यांचे अस्सल भाषण ऐकणेही एक पर्वणीच विधानसभेतही अनेक भाषणे त्यांची गाजली. रोखठोक, स्पष्ट आणि आक्रमक स्वभाव असलेल्या अजित पवारांचे आज बारामतीत अत्यंत वेगळे दिसले. त्यांच्याकडे एका झेरॉक्स दुकानाच्या चालकाने एक इच्छा व्यक्त केली आणि अजित पवारांनी तात्काळ त्याची ती इच्छाही पूर्ण केली.
अजित पवार बारामती दौऱ्यावर
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज बारामती दौरा होता. या दौऱ्यात विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी केली. त्यानंतर दौऱ्यावर असताना त्यांनी बारामतीत नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी ध्वजवंदन केले.
काय झाले नमके?
एका कार्यकर्त्याने झेरॉक्सच्या दुकान सुरू केले. सुहास मढवी असे दुकानदाराचे नाव आहे. त्या दुकानाचे उद्घाटन अजित पवारांनी करावे, असा मानस त्याचा होता. त्याने अजित पवारांना विनंती केल्यानंतर त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता या कार्यकर्त्यांच्या छोट्याशा दुकानाच्या उद्घाटनासाठी दाखल झाले.
झेराॅक्सही कशी काढायची शिकले!
अजित पवार म्हणाले, झेरॉक्स कशी काढतात हे देखील शिकून घेतले. तसेच त्याला त्याच्या दुकानासाठी शुभेच्छा देखील दिल्या. कार्यकर्त्यांची आपुलकीने चौकशी देखील केली. अजित पवार यांनी बारामती येथील प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण केले त्यानंतर प्रशासनात चांगली कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.
या केल्या भावना व्यक्त
अजित पवार म्हणाले, मी जर बटन दाबून दुकानदाराचे समाधान होत असेल तर कशाला त्याला नाराज करायचे? म्हणून दुकानाला भेट दिली. बारामतीत वेडे वाकडे प्रकार मी खपवून घेणार नाही. माझ्या जवळचा जरी वेडा वाकडा वागत असेल तर हायगय करू नका, अशा सूचना अजित पवारांनी पोलिसांना दिल्या आहेत. सगळ्यांना नियम सारखे आहेत अजित पवारांचे कुटुंब असले तरी त्यांना देखील नियम सारखेच आहेत, असेही अजित पवार म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.